Maharashtra Cooperation Department Promotion: सहकार विभागात पदोन्नतींची चाहूल; आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदी बढतीचा प्रस्ताव मंत्रालयात

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निर्णयाची शक्यता; पुढील आर्थिक वर्षापूर्वीच बदल्यांचाही हंगाम सुरू
Promotion
PromotionPudhari
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे: राज्याच्या सहकार आयुक्तालयांतर्गत विभागीय सहनिबंधक दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदावरील पदोन्नतीबाबतचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून त्यास हिरवा कंदील मिळून संबंधितांना पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांकडून समजली. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षापूर्वीच सहकार विभागात पदोन्नती, बदल्यांचा हंगाम सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Promotion
Pune Panchayat Samiti Chairman Election: पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस; ९ मार्चला मतदान

सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग््राक्रमावर असून, संबंधित पदांवरील अधिकाऱ्यांची योग्य वेळी निवड झाल्यास कामात सुलभता येऊ शकते. त्यादृष्टीने सहकार आयुक्तालयाकडून विभागीय सहनिबंधक दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदी बढत्यांचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यावर संबंधित प्रस्तावावर सचिव व अन्य विभागांची मंजुरी मिळण्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे हा विषय अंतिमतः जाऊन बढत्यांवर शिक्कामोर्तब अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

Promotion
Pune Lunar Eclipse Moksha Kal: पुण्यात खग्रास चंद्रग्रहणाचा केवळ ४-६ मिनिटांचा मोक्षकाळ

आठ विभागीय सहनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्यांमध्ये प्रामुख्याने योगिराज सुर्वे, सचिन रावल, प्रवीण वानखेडे, मिलिंद भालेराव, बाजीराव शिंदे, राजेंद्र दराडे, संगीता डोंगरे आणि नीलिमा गायकवाड यांचा समावेश आहे. अपर निबंधकपदी बढत्यांवर शिक्कामोर्तब झाल्यावर जिल्हा उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांना विभागीय सहनिबंधकपदावर बढत्याही प्रतीक्षेत आहेत. त्यादृष्टीने सहकार आयुक्तालयातून 30 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्तावही मंत्रालयात पाठविण्यात आला आहे.

Promotion
Pune Municipal Store Department Irregularities: महापालिकेच्या भांडार विभागातील अनियमितता; २० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

त्यामधील किती अधिकाऱ्यांना बढती मिळणार, याबद्दलची उत्सुकता सहकार विभागात आहे. दरम्यान, पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच यंदा बढत्यांबरोबरच बदल्यांचा हंगामही सुरू झाल्यामुळे इच्छुक अधिकाऱ्यांनी मंत्रालयस्तरावर आत्तापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात आले.

Promotion
Bhor Nagar Parishad Budget 2026-27: भोर नगर परिषदेचा ७८.३९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; मालमत्ता कर वाढ नाही

अपर निबंधक पदावरील उपनिबंधकांचे बस्तान कधी हलणार?

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीवरील सचिवांचे पद हे सहकारच्या अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आहे. त्याठिकाणी सचिवपदावर बऱ्याच कालावधीपासून सहकार उपनिबंधक दर्जाचे अधिकारी राजाराम धोंडकर हेच कार्यरत आहेत. अशा अनेक संस्थांवर अपर निबंधक अधिकाऱ्यांची पदे मंजूर असूनही राजकीय वरदहस्तामुळे कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ पदाचा पदभार देऊन कामे सुरू आहेत. त्याची खदखद सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी खासगीत उघडपणे बोलून दाखवित आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अखत्यारीतील सहकार आयुक्तालय, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारखी महत्त्वाची कार्यालये पुण्यात असूनही त्यांच्या फारशा बैठकाच पुण्यात होत नाहीत. त्यामुळे अशी दूरवस्था कायम असल्याची टीकाही खासगीत सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news