Pune Lunar Eclipse Moksha Kal: पुण्यात खग्रास चंद्रग्रहणाचा केवळ ४-६ मिनिटांचा मोक्षकाळ

तांबूस चंद्रबिंबाचे अल्पदर्शन; शहरात धुळवड आणि ग्रहणाचे संमिश्र चित्र
Pune Lunar Eclipse Moksha Kal
Pune Lunar Eclipse Moksha KalPudhari
Published on
Updated on

पुणे: संपूर्ण जगासह देशातील काही भागांतून खग््राास चंद्रग््राहण दिसले. मात्र, पुणे शहरातून अवघ्या 4 ते 6 मिनिटांचा मोक्षकाळ दिसला. त्यावेळी चंद्रबिंब मोठे अन्‌‍ तांबूस रंगाचे दिसत होते. मंगळवारी सायंकाळी 6.45 ते 7.01 असा मोक्षकाळ दिसत होता. ग््राहण कालावधीत खूप कमी असल्याने विज्ञान संस्थांना ग््राहण दाखवण्याच्या कार्यक्रमांचे यंदा आयोजन केले नाही.

Pune Lunar Eclipse Moksha Kal
Pune Municipal Store Department Irregularities: महापालिकेच्या भांडार विभागातील अनियमितता; २० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

मंगळवारी (दि. 3 मार्च) धुळवडीच्या दिवशी शहरातून खंडग््राास चंद्रग््राहण दिसणार असल्याने काही मंदिरे सकाळ 6 पासून ते सायंकाळी 7 पर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात आली होती, तर काही मंदिरात नागरिक बाहेरून दर्शन करीत होते, तर काही नागरिक जप, अनुष्ठान करत बसलेले दिसले, तर शहरातून मोक्षकाळ म्हणजे ग््राहण संपताना दिसणार असल्याने विज्ञान संस्थांच्या वतीने दरवर्षी होणारे ग््राहणदर्शन कार्यक्रम झाले नाहीत.

Pune Lunar Eclipse Moksha Kal
Bhor Nagar Parishad Budget 2026-27: भोर नगर परिषदेचा ७८.३९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; मालमत्ता कर वाढ नाही

शहरात दिसले संमिश्र चित्र

सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील बहुतांश नागरिकांनी धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. यात तरुणाई आघाडीवर होती. तळजाई टेकडी, सारसबाग परिसरात रात्री 8 पर्यंत रंग खेळून दमलेले लोक भेळपुरी खाऊन श्रमपरिहार करताना दिसली. असे संमिश्र चित्र मंगळवारी शहरात दिसले. शहरात ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी ग््राहण निरीक्षण आणि त्याची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी केसरीवाड्यावरील दुर्बीणीतून लाईव्ह दाखवले जाते. मात्र, शहरातून मोक्षकाळ अन्‌‍ तो देखील 4 ते 7 मिनिटांचा दिसणार असल्याने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news