Pune Panchayat Samiti Chairman Election: पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस; ९ मार्चला मतदान

मुळशी, जुन्नर व भोरमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय समीकरणांना वेग; पक्षांतर्गत बैठका सुरू
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

पुणे: जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने तेथील समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे मुळशी, जुन्नर आणि भोर पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी चुरस अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. सोमवारी (ता. 9) सभापती व उपसभापतिपदांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Elections Voting
Pune Lunar Eclipse Moksha Kal: पुण्यात खग्रास चंद्रग्रहणाचा केवळ ४-६ मिनिटांचा मोक्षकाळ

जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. तालुकानिहाय राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडून आलेले सदस्य आपापली मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षश्रेष्ठींकडून तालुकास्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी तालुकानिहाय बैठकांना वेग दिला आहे. सर्वच पक्षांच्या तालुकाध्यक्षांकडून नवनिर्वाचित सदस्य व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठीही संभाव्य कल तपासला जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग््रेास आणि भाजप या प्रमुख पक्षांकडून बैठका सुरू आहेत.

Elections Voting
Pune Municipal Store Department Irregularities: महापालिकेच्या भांडार विभागातील अनियमितता; २० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, राष्ट्रवादी काँग््रेासचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या पक्ष बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करत पंचायत समित्यांमध्ये पक्षाच्या विचारांचा सभापती जास्तीत जास्त ठिकाणी निवडून यावा, यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय आघाडीचे पर्याय, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि समन्वयाचा फॉर्म्युला यांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यातील सभापतिपदांसाठी आरक्षणानुसार एक जागा अनुसूचित जमाती, एक अनुसूचित जमाती (महिला), दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग, दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), तीन सर्वसाधारण, तर चार जागा महिला राखीव असणार आहेत.

Elections Voting
Bhor Nagar Parishad Budget 2026-27: भोर नगर परिषदेचा ७८.३९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; मालमत्ता कर वाढ नाही

स्पष्ट बहुमत नसलेल्या ठिकाणी अधिक चुरस

जुन्नर पंचायत समितीत भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग््रेासचे सहा, शिवसेनेचे आठ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एक, असे एकूण 16 सदस्य आहेत. येथे कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने आघाडीचे पर्याय तपासले जात आहेत. भोरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग््रेास प्रत्येकी चार अशा समान संख्येने सदस्य आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी एका मतालाही मोठे महत्त्व राहणार आहे. मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेासचे तीन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. भोरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये समन्वय आणि आघाडीचा फॉर्म्युला निर्णायक ठरणार आहे.

Elections Voting
Haveli Revenue Samadhan Shibir: पूर्व हवेलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा प्रारंभ

आठ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे आठ पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व राहणार आहे. त्यात मावळमध्ये 10 सदस्य निवडून आले आहेत. बारामतीमध्ये 10 सदस्य, इंदापूरमध्ये 16 सदस्य, राजगडमध्ये 3 सदस्य, आंबेगावमध्ये 8 सदस्य, शिरूरमध्ये 8 सदस्य, पुरंदरमध्ये 4 सदस्य, तर हवेली पंचायत समितीत 6 सदस्य निवडून आले आहेत. दौंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, खेडमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ने 16 पैकी 9 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news