

पुणे: यंदाच्या जूनमध्ये शहरावर पाऊस रुसला असून, २६ दिवसांत केवळ ४७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात जूनच्या सरासरीच्या अवघे २० टक्केच पाऊस बरसला आहे. त्याउलट मागच्या वर्षीच्या जूनमध्ये तब्बल २६७.५ मि.मी. पाऊस झाला होता. शहरात यंदा २० जूनपर्यंत शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.शहरात १९५८ नंतर दुसऱ्यांदा जूनमध्ये इतका कमी पाऊस झाला आहे.
जून महिन्यात दरवर्षी सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्तच पाऊस पुणे शहरात पडतो. गत काही वर्षांतील आकडेवारी तपासली असता हाच ट्रेंड दिसून येतो. यापूर्वी १९५८ मध्ये शहरात जून मध्ये ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तर सन २०२२ मध्ये २४ जून रोजी शहरात मान्सूनचे आगमन झाल्याने त्या वर्षी केवळ ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतरचा कमी पाऊस यंदाच्या जूनमध्ये ४७.६ मि.मी. झाला आहे.
शहरातील पावसाचे वेगळे विक्रम
वर्ष - पाऊस
१९१५ -३६२ (सर्वाधिक )
१९५८ - ६५
२०२२ -३५ (सर्वात कमी )
वर्ष पाऊस (मि.मी.)
२०२६ (१ ते २६ जून)--४७.६
२०२५--२६७.५
२०२४--२५२
२०२३--८९
२०२२--३५
२०२१--१६५
वर्ष पाऊस (मि.मी.)
२०२०--२२१.७
२०१९--१९७.९
२०१८--१२४
२०१७--१४८
२०१६--१५१
शहरात कुठे किती पाऊस पडतो...(मि.मी.)
भाग सरासरी यंदा बरसला
शिवाजीनगर १३२.५ ३२
कोथरुड १५२ ३०.४
खडकवासला ५२.१ ४३.१
हडपसर १५२ १०.६
वाघोली १५२ ८
केशवनगर १३२ ४३
यंदाची स्थिती
यंदा सरासरीच्या २० टक्के पाऊस झाला म्हणजे सुमारे ८० टक्के तूट आहे.
यंदा जूनच्या २० दिवसांत शहरात शुन्य मी.मी. पावसाची नोंद १९५८ नंतर असे दुसऱ्यांदा घडले.
यापूर्वी २०२२ मध्ये २४ जूननंतर पाऊस आला होता.
यंदा मान्सून उशिरा आला, त्यामुळे शहरात तीन आठवडे पाऊस झाला नाही.
गत दोन दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. जून अखेर मोठ्या पावसाचा अंदाज नाही.
यंदाची तूट सुमारे १४२ मि.मी.