Pune Railway Block: पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ४२ गाड्यांच्या ९८ फेऱ्या रद्द

हडपसर-घोरपडी-पुणे तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मोठा ब्लॉक; २५ गाड्या वळविणार, ३५ गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये बदल
Indian Railway
Indian RailwayPudhari
Published on
Updated on

पुणे /दौंड: पुणे रेल्वे विभागातील हडपसर-घोरपडी-पुणे (HDP-GCMC) तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) व नॉन इंटरलॉकिंग (NI) कामासाठी तब्बल १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या अभियांत्रिकी संदेशानुसार या कामासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून, पुणे, हडपसर, दौंड तसेच पुणे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Indian Railway
Sugarcane Crushing Season 2026-27: ऊस गाळप हंगाम यंदा शंभर दिवसांतच आटोपण्याची शक्यता; साखर उद्योगासमोर नवे आव्हान

या कामामुळे एकूण ४२ गाड्यांच्या ९८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच २५ गाड्यांच्या ३६ फेऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. ३५ गाड्यांचे ९९ ट्रिप्स शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार असून, २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन केले जाणार आहे. याशिवाय १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांचे वेळापत्रक बदलून (Reschedule) संचालन करण्यात येणार आहे.

Indian Railway
Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एकाला अटक; कटाची माहिती असल्याचा आरोप

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे

रेल्वे प्रशासनाने हा मोठा ब्लॉक तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी नियोजित केला आहे. त्यामुळे पुणे, हडपसर, दौंड, सोलापूर, बारामती तसेच पुण्यामार्गे ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

Indian Railway
Pune NIV Nakshatra Supercomputer: पुण्याच्या एनआयव्हीमध्ये ‘नक्षत्र’ महासंगणक कार्यान्वित; विषाणू संशोधनाला मिळणार वेग

पुणे-सोलापूर प्रवाशांना मोठा फटका

या ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. १२१६९ आणि १२१७० सोलापूर-पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या १९ ते २३ सप्टेंबर तसेच ३ व ४ ऑक्टोबर रोजी रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत या गाड्यांच्या प्रत्येकी ७ फेऱ्या रद्द होणार आहेत. याशिवाय ७१४०७ पुणे-दौंड डेमू आणि ७१४०८ दौंड-पुणे डेमू या गाड्यांच्या १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येकी १६ फेऱ्या रद्द केल्या.

३५ गाड्यांचे संचालन अंशतः बदलणार

ब्लॉकदरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यापर्यंत न येता किंवा पुण्याहून न सुटता अन्य स्थानकांवरून शॉर्ट टर्मिनेट अथवा शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहेत. २२९४४ इंदूर-दौंड एक्स्प्रेस आणि २२९४३ दौंड-इंदूर एक्स्प्रेस या गाड्यांच्या प्रत्येकी १६ फेऱ्या प्रभावित होणार आहेत. तसेच २०४९५ जुहू-हडपसर, २०४९६ हडपसर-जुहू, १७०१४ काझीपेट-हडपसर, १७०१३ हडपसर-काझीपेट, १२१५७ पुणे-सोलापूर, १२१५८ सोलापूर-पुणे, ११०२५ पुणे-अमरावती आदी गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही बदल केले आहेत.

Indian Railway
Bori Budruk Crematorium: बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद साहित्य; बाहुल्या, फोटो अन्‌ टाचण्यांमुळे खळबळ

२५ गाड्या पर्यायी मार्गाने

ब्लॉकमुळे २५ गाड्यांच्या ३६ फेऱ्या पुणे-लोणावळा-कल्याण, पुणे-मिरज, मिरज-कुर्डूवाडी-दौंड अशा विविध पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. यात १२२२१ पुणे-हावडा एक्स्प्रेस, १२२२२ हावडा-पुणे एक्स्प्रेस, ११०७८ जम्मू तवी-पुणे, ११३०२ एसबीसी-सीएसएमटी, २२१५९ सीएसएमटी-मदुराई, १२७८० निजामुद्दीन-वास्को-द-गामा यांसह अनेक गाड्यांचा समावेश आहे.

४ ऑक्टोबरला सर्वाधिक मोठा ब्लॉक

४ ऑक्टोबर रोजी या कामाचा अंतिम आणि सर्वाधिक परिणामकारक टप्पा राहणार आहे. या दिवशी रात्री १२ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत HDP-GCMC विभागात वाहतूक ब्लॉक, तर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत S&T वाहतूक ब्लॉक राहणार आहे. याशिवाय पुणे RRI, GIT यार्ड आणि हडपसर यार्ड परिसरातही काम केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news