Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एकाला अटक; कटाची माहिती असल्याचा आरोप

चेतनचा वर्गमित्र रितेश हंगे पोलिसांच्या ताब्यात; १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पुणे/लोणावळा: केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) रात्री रितेश हंगे याला अटक केली. केतनच्या खुनाच्या कटाची माहिती असल्याचा आरोप रितेशवर आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रितेश हा चेतनचा वर्गमित्र आहे.

Arrested
Pune NIV Nakshatra Supercomputer: पुण्याच्या एनआयव्हीमध्ये ‘नक्षत्र’ महासंगणक कार्यान्वित; विषाणू संशोधनाला मिळणार वेग

केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यात आला होता. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना यापूर्वी अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Arrested
Bori Budruk Crematorium: बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद साहित्य; बाहुल्या, फोटो अन्‌ टाचण्यांमुळे खळबळ

तपासादरम्यान चेतनच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. चेतन आणि सिया यांनी खुनासंदर्भातील काही चॅट डिलीट केले होते. पोलिसांनी ते चॅट रिकव्हर केल्यानंतर रितेशसोबत केतनच्या खुनाची चर्चा झाल्याचे समोर आले. चेतन आणि सियाने १८ जून रोजी रितेशला लोहगडावर त्यांच्यासोबत येण्यास अनेकदा सांगितले होते.

Arrested
Khadkeshwar Vegetable Market: फुरसुंगीतील खडकेश्वर भाजी मंडईचा निधी रखडला; प्रशासकीय इमारतीचा प्रस्तावही रद्द

मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रितेश चेतनच्या संपर्कात होता. केतनच्या खुनानंतर चेतनने रितेशची भेट घेतली होती, तर सियाही त्याच्या संपर्कात होती. रितेश हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला यापूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली होती.

Arrested
Shravan Sari 2026: पुण्यात ‘श्रावण सरी’चा जल्लोष; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

मात्र, तपासातून त्याची भूमिका अधिक स्पष्ट झाल्यानंतर त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. दरम्यान, रितेशला केतनच्या खुनाच्या कटाची नेमकी किती माहिती होती, तो केवळ कटाची माहिती असलेला होता की प्रत्यक्ष कट रचण्यात आणि तो अमलात आणण्यात त्याची सक्रिय भूमिका होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्या पोलिस कोठडीत या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news