Bori Budruk Crematorium: बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद साहित्य; बाहुल्या, फोटो अन्‌ टाचण्यांमुळे खळबळ

लाल कापडात बांधलेल्या वस्तू आढळल्या; ग्रामस्थांकडून चौकशी, सीसीटीव्ही व प्रकाशव्यवस्थेची मागणी
Suspicious Items  In Crematorium
Suspicious Items In Crematorium Pudhari
Published on
Updated on

बेल्हे: बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील सार्वजनिक स्मशानभूमीत लाल कपड्यात बांधलेल्या बाहुल्या, अनोळखी व्यक्तींचे फोटो, टाचण्या तसेच हळद-कुंकू व बुका आदी संशयास्पद साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ६) सकाळी दशक्रिया विधीसाठी स्मशानभूमीत आलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

Suspicious Items  In Crematorium
Khadkeshwar Vegetable Market: फुरसुंगीतील खडकेश्वर भाजी मंडईचा निधी रखडला; प्रशासकीय इमारतीचा प्रस्तावही रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही नागरिक दशक्रिया विधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे लाल रंगाचे कापड अंथरलेले दिसले. जवळ जाऊन पाहणी केली असता एका फुटलेल्या मडक्यात काळ्या रंगाच्या दोन बाहुल्या, अनोळखी पुरुष व महिलेचे फोटो, हळद-कुंकू, बुका तसेच फोटोंवर टाचण्या टोचलेले साहित्य आढळून आले. संबंधित फोटो गावातील कोणत्याही व्यक्तींचे नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Suspicious Items  In Crematorium
Shravan Sari 2026: पुण्यात ‘श्रावण सरी’चा जल्लोष; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

या घटनेनंतर स्मशानभूमीत असे साहित्य कोणी व कोणत्या उद्देशाने आणून ठेवले, याबाबत ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत; मात्र, या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Suspicious Items  In Crematorium
Khadakwasla Fursungi Tunnel Project: खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे काम वेगात; वर्षभरात ५ किलोमीटर खोदाई पूर्ण

सार्वजनिक स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराची चौकशी करावी व संबंधितांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामपंचायतीने स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Suspicious Items  In Crematorium
Bibwewadi Dahi Handi: बिबवेवाडीत ध्वनिप्रदूषणाचा दणका; दहीहंडी मंडळावर गुन्हा, साउंड सिस्टिम जप्त

नागरिकांना आवाहन

परिसरात कुठेही अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू किंवा साहित्य आढळून आल्यास नागरिकांनी त्याला हात न लावता तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. अफवा न पसरवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news