Pune POCSO Case: शिक्षणाच्या नावाखाली गैरकृत्य; पुण्यात खासगी क्लास शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

आंबेगाव पोलिसांकडून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल; कात्रजमधील शिक्षकाला अटक, पुढील तपास सुरू
Assault Case
Assault CasePudhari
Published on
Updated on

पुणे: शिक्षणाचे आमिष दाखवून खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध ''पोक्सो'' आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Assault Case
SPPU College Admission Action: प्राध्यापकांची रिक्त पदे न भरणाऱ्या महाविद्यालयांना पुणे विद्यापीठाचा दणका; प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्याचा इशारा

याबाबत एका १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी कोंढवा येथे तर शिक्षक हा कात्रज भागात राहायला आहे. ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही महिन्यांपासून पीडित मुलगी आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून घरातच राहत होती.

Assault Case
MPSC Online Exam: MPSC ऑनलाईन परीक्षा पद्धतीला तूर्तास स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन

याच दरम्यान, कॉम्प्युटर आणि रोबोटिक्सचे ऑनलाइन क्लास घेणाऱ्या या शिक्षकाने तिला त्याच्याकडे ''अ‍ॅडमीन'' म्हणून काम करण्याची आणि शिकण्याची संधी दिली. दररोज रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या ऑनलाइन क्लासेसदरम्यान आरोपी शिक्षक माउस आणि कीबोर्ड वापरण्याच्या बहाण्याने पीडितेला वारंवार नकोसा स्पर्श करत असे.

Assault Case
Mahanand Dairy Coal Plant: महानंद डेअरीच्या कोळसा प्रकल्पाला NGTचा दणका; 15 जुलैपासून बंद ठेवण्याचे आदेश

अंदाजे ३ ते ४ आठवड्यांपूर्वी, रात्रीच्या वेळी ऑनलाइन क्लास उशिरा संपल्याने पीडित मुलगी शिक्षकाच्या घरीच मुक्कामास थांबली होती. मध्यरात्री सर्व जण हॉलमध्ये झोपलेले असताना आरोपीने तिच्याशी अत्यंत गैरवर्तन केले.

Assault Case
Rahul Gandhi Savarkar Defamation Case: 'सावरकरांनी तडजोड केली असती तर पंतप्रधान झाले असते' हे माझे वैयक्तिक मत – सात्यकी सावरकर

या धक्कादायक प्रसंगामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर काही दिवसांनंतर आपल्या मोठ्या बहिणीला घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबासह इतर लोकांनी आरोपीला गाठून जाब विचारला असता, त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यांनतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. आंबेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news