Pune Petrol Pump Rumor: इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवल्याने पुण्यात पेट्रोल पंपावर कारवाई

अप्रमाणित माहितीमुळे प्रशासनाचा कडक निर्णय; विक्री तात्काळ बंद, 24 तासांत स्पष्टीकरणाची नोटीस
Fuel
FuelPudhari
Published on
Updated on

पुणे: इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुलगेट परिसरातील एका पंपचालकावर कारवाई करण्यात आली. संबंधित पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे.

Fuel
Maharashtra Agriculture University Audit: राज्यातील कृषि विद्यापीठांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल व विद्युत ऑडिटचे आदेश

जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोलपंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

Fuel
Pune Gas Leak Restaurant: भारती विद्यापीठ परिसरात गॅसगळती; चार कामगार जखमी

ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स 2024 अंतर्गत गंभीर अनियमितता म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

Fuel
Pune Stray Dog Problem: पुण्यात भटक्या श्वानांवर महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याबाबत जनजागृती केली जात असताना, अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यामुळे इतर पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

Fuel
Pune Zilla Parishad Ranking: पुणे जिल्हा परिषदेला ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम क्रमांक

...लेखी स्पष्टीकरण मागितले

या पेट्रोलपंपचालकास 24 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news