Pune Ganesh Visarjan Theft: गणेश विसर्जनाच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे शहरात १३ गुन्हे दाखल

मोबाईल, सोनसाखळ्या, मंगळसूत्र आणि रोकड लंपास; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला
Ganesh Visarjan Theft
Ganesh Visarjan TheftPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक, दर्शनासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या तुफान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दि. २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वेगवेगळ्या रस्त्यांवर चोरट्यांनी नागरिकांना लक्ष्य करीत मोबाईल, सोनसाखळ्या, मंगळसूत्र आणि पाकीट लंपास केले.

Ganesh Visarjan Theft
El Nino February 2027: अल निनोचा फेब्रुवारीत कळस; यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याचा इशारा

याप्रकरणी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचे आत्तापर्यंत १३ गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व १३ घटनांमध्ये मिळून एकूण साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला गेला. यामध्ये १ मंगळसूत्र, १ मिनी मंगळसूत्र, ७ सोनसाखळ्या, ६ मोबाईल आणि २ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.

Ganesh Visarjan Theft
Patas Road Work Controversy: पाटसच्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा सवाल; सार्वजनिक निधी खासगी घरासाठी?

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर भाविकांची तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला.

Ganesh Visarjan Theft
Pimperkhed Cabbage Market Price: कोबीला बाजारभावाचा फटका; उत्पादन खर्चही निघेना

विविध भागांतील घटना अन् दाखल तक्रारी

  • बेलबाग चौक : गर्दीचा फायदा घेऊन रामचंद्र गोपाळ गोधळकर (वय २०, रा. धायरी) यांचा ८ हजारांचा मोबाईल चोरट्याने लांबविला. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : ढोल-ताशा पथकाचे वादन पाहत असलेले श्रीनिवास धर्मापुरी शक्करी कोंडा (वय ३५, रा. येरवडा) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपयांची सोनसाखळी व लॉकेट पहाटे सव्वातीन वाजता चोरट्याने पळवले.

  • मंडई परिसर (बाबू गेणू मंडळ) : गर्दीत अर्पिता भाऊ गोरे (वय १७, रा. हडपसर) यांची ४० हजार ९४० रुपयांची सोनसाखळी, तर सायली संतोष भागवत (वय २६, रा. हडपसर) यांची ३७ हजार ७५७ रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली.

  • लक्ष्मी रस्ता : गणपती चौकात ऐश्वर्या सुशांत शिंदे (वय ३२, रा. बाणेर) यांची ५० हजारांची सोनसाखळी चोरीस गेली, तर चित्रा चित्रपटगृहाजवळ चंदन सदानंद लोटेकर (वय ५०, रा. पुणे) यांच्या खिशातील २ हजारांची रोकड व पाकीट मारले गेले.

Ganesh Visarjan Theft
Chakan Road Widening: चाकणमधील पाच ठिकाणी रस्ते रुंदीकरण; तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील कोंडी सुटणार?
  • शनिवारवाडा खाऊ गल्ली : शिवम बाळासाहेब शिंदे (वय २०, रा. पिंपरी) आणि त्यांच्या मित्राचे असे एकूण २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्याने पळवले.

  • समाधान चौक : मुलचंद मिलजवळ गणपती दर्शनासाठी आलेले अभिषेक गिरीश गाडे (वय २९, रा. शिवणे) यांचा ५० हजारांचा मोबाईल दोन भामट्यांनी लांबवला.

  • केळकर रस्ता : मोरेश्वर कॉर्नरजवळ स्नेहा बळीराम पाणिंद्रे (वय ३२, रा. टिळक रस्ता) यांची ५० हजारांची सोनसाखळी चोरीस गेली. तसेच, याच चौकात कार्यक्रम पाहणाऱ्या ज्योती संतोष हिरेमठ (वय ५१, रा. सांगवी) यांचे ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चार जणांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. याशिवाय डॉ. गोविंद खरे चौकात आरती परशुराम जाधव (वय ३२, रा. जनवाडी) यांची २० हजार रुपयांची सोनसाखळी लांबवली.

  • सदाशिव पेठ : रूपरंग साडी दुकानाजवळ ज्ञानदा ज्ञानेश्वर कांडलकर (वय २०, रा. हिंगणे खुर्द) यांची २५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली.

  • नगरकर तालीम चौक : बाजीराव रस्त्यावरील गर्दीतून जात असताना रुचिका नितीन माळी (वय ३४, रा. नऱ्हे) यांच्या गळ्यातील १ लाख ३१ हजार ६१७ रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र चोरट्याने अलगद लांबवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news