Pune School Illegal Shed Encroachment: पर्वतीत शाळेसमोर अनधिकृत शेड; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची भीती; कारवाईची संस्थेची मागणी
Pune School Illegal Shed
School Illegal ShedPudhari
Published on
Updated on

पुणे: पर्वती परिसरातील ‌‘नंदादीप एज्युकेशन सोसायटी‌’च्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर अनधिकृत पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे मंदिर देखील असून, यामुळे शाळेत येणारा मार्ग अरुंद झाला आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने महापालिकेच्या शहर अभियंत्यांकडे तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Pune School Illegal Shed
Pune Road Project Credit Note Controversy: क्रेडिट नोटवर रस्ते कामांचा वाद; फौजदारी चौकशीची मागणी

संस्थेच्या निवेदनानुसार, पर्वती येथील शाळेच्या प्रवेशद्वारासमोर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातून विद्यार्थ्यांची ये-जा होत असून, रिक्षा, स्कूल व्हॅन आणि पालकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

Pune School Illegal Shed
Pune RMC Plant Pollution Action: आरएमसी प्लांटवर धडक कारवाई; नियम पाळा नाहीतर शहराबाहेर जा

अशा ठिकाणी अचानक उभारलेल्या शेडमुळे वाहतूक कोंडी व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी गणपती मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. त्या वेळीही बांधकामाबाबत माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून माहिती मागविण्यात आली होती.

Pune School Illegal Shed
Onion Farmers Storage Cost Increase: लोखंड दरवाढीचा फटका; कांदा शेतकरी अडचणीत

मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. नुकतीच उभारण्यात आलेली पत्र्याची शेड आणि मंदिराचे पक्के बांधकाम हे दोन्ही रस्त्याच्या जागेत येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Pune School Illegal Shed
Velhe Murder Accused Arrested: 24 वर्षांपासून फरार खून आरोपीला अखेर अटक

त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिका शाळेच्या आवारात पोहोचू शकणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news