Haveli Revenue Samadhan Shibir: पूर्व हवेलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा प्रारंभ

वाघोली, अष्टापूर, उरुळी कांचन व थेऊर येथे टप्प्याटप्प्याने शिबिरे; 7/12 दुरुस्ती व विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajPudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर: पूर्व हवेली तालुक्यामध्ये ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर‌’ अभियानाचा पहिला टप्पा राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अपर तहसील कार्यालय, लोणी काळभोर यांच्या कार्यक्षेत्रातील वाघोली, अष्टापूर, उरुळी कांचन व थेऊर मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने व अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj
Ujani Dam Water Release Stopped: उजनी धरणातून भीमा नदीतील विसर्ग बंद; शेटफळ तलावाचे आवर्तन ५ मार्चपासून

ग््राामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने सोडविणे, प्रलंबित तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मंडल अधिकारी स्तरावरील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : शनिवार, दि. 7 मार्च - वाघोली (केसनंद), शनिवार, दि. 14 मार्च - अष्टापूर, शुक्रवार, दि. 10 एप्रिल - उरुळी कांचन (सोरतापवाडी), शुक्रवार, दि. 17 एप्रिल - थेऊर (कोलवडी).

Chhatrapati Shivaji Maharaj
Baramati Tandulwadi Robbery: बारामतीतील तांदुळवाडी लेक परिसरातील दरोडा; तिघांना अटक, ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

या शिबिरांत भोगवटा वर्ग 2 जमिनींचे भोगवटावर्ग 1 मध्ये रूपांतर करून दुरुस्त 7/12 उतारे वाटप, तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची तपासणी, भूसंपादन व अकृषिक प्रकरणांतील दप्तर अद्ययावत करणे, ‌‘सर्वांसाठी घरे‌’ योजनेअंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांची नोंद, ‌‘जिवंत 7/12‌’ मोहिमेअंतर्गत नोंदी निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कमार्फत 7/12 वरील चुका दुरुस्त करणे, तसेच विविध फेरफार नोंदींचे वितरण अशा सेवा दिल्या जाणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj
Shivneri Shivjayanti 2026: किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार भव्य शिवजन्मोत्सव; ४ ते ६ मार्चदरम्यान विविध कार्यक्रम

याशिवाय, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना मंजुरी आदेश, शालेय दाखले वितरण, पाणंद रस्त्यांबाबत प्रशासकीय मान्यता, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत प्रमाणपत्रे, अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन, तसेच ॲग््राीस्टॅक, पीएम किसान व ई-केवायसीसंदर्भातील कामकाजही शिबिरात पार पडणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Daund Crime Rise: दौंडमध्ये वाढती गुन्हेगारी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित या अभियानात लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ही शिबिरे नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news