Bhor Nagar Parishad Budget 2026-27: भोर नगर परिषदेचा ७८.३९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; मालमत्ता कर वाढ नाही

पाणीपुरवठा, भुयारी गटार व रस्त्यांना प्राधान्य; महिला, दिव्यांग व दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र तरतूद
Bhor Nagarparishad
Bhor NagarparishadPudhari
Published on
Updated on

भोर: भोर नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 78 कोटी 39 लाख रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Bhor Nagarparishad
Haveli Revenue Samadhan Shibir: पूर्व हवेलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा प्रारंभ

शुक्रवारी (दि. 27) नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्षा ॲड. जयश्री शिंदे, गटनेते अमित सागळे, मुख्याधिकारी गजानन शिंदे, तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Bhor Nagarparishad
Ujani Dam Water Release Stopped: उजनी धरणातून भीमा नदीतील विसर्ग बंद; शेटफळ तलावाचे आवर्तन ५ मार्चपासून

नगर परिषदेच्या शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रति उपस्थितीस 5 रुपयांच्या विशेष भत्त्‌‍याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, विकासकामांना गती देताना नगर परिषदेची आर्थिक स्थिती सक्षम राहावी, यासाठी कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना आणि शहरातील रस्ते मजबुतीकरण या कामांना अग््राक्रम देण्यात आला आहे.

अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण, दुर्बल घटक आणि दिव्यांग नागरिकांसाठी प्रत्येकी 5 टक्के निधी राखून ठेवण्यात आला आहे. विकासाभिमुख व संतुलित खर्चाचा विचार करून तयार केलेला हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Bhor Nagarparishad
Baramati Tandulwadi Robbery: बारामतीतील तांदुळवाडी लेक परिसरातील दरोडा; तिघांना अटक, ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महत्त्वाच्या योजना व तरतुदी :

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 5 कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजना 85 लाख रुपये, नगरोन्नती योजना (जिल्हा स्तर) 10 कोटी रुपये, नगरोन्नती योजना (राज्य स्तर) 5 कोटी रुपये, वैशिष्ट्‌‍यपूर्ण योजना 10 कोटी रुपये, विशेष वैशिष्ट्‌‍यपूर्ण योजना 5 कोटी रुपये, अपारंपरिक ऊर्जा 2 कोटी रुपये, विशेष रस्ता अनुदान 5 कोटी रुपये, नागरी सेवा सुविधा कामे 5 कोटी रुपये.

उत्पन्नाच्या प्रमुख बाबी: संकलित कर:

2 कोटी 10 लाख रुपये, पाणीपट्टी : 80 लाख रुपये, बाजार भाडे वसुली : 19 लाख रुपये, पार्किंग शुल्क : 2 लाख रुपये, नळ जोडणी शुल्क : 2 लाख रुपये, रस्ता खोदाई शुल्क : 2 लाख रुपये, स्वच्छता वापर शुल्क : 22.50 लाख रुपये, विकास शुल्क : 15 लाख रुपये, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक : 20 लाख रुपये, निविदा अर्ज शुल्क : 15 लाख रुपये

Bhor Nagarparishad
Shivneri Shivjayanti 2026: किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार भव्य शिवजन्मोत्सव; ४ ते ६ मार्चदरम्यान विविध कार्यक्रम

विशेष तरतुदी : महिला व बालकल्याण:

8.50 लाख रुपये, दिव्यांग निधी : 8.50 लाख रुपये, दुर्बल घटक : 8.50 लाख रुपये.

महसुली व भांडवली बाबी:

मुद्रांक शुल्क अनुदान 35 लाख रुपये, सहायक अनुदान 4 कोटी 20 लाख रुपये.

अर्थसंकल्पाचा सारांश:

महसुली जमा : 11 कोटी 21 लाख रुपये, भांडवली जमा 63 कोटी 71 लाख रुपये, महसुली खर्च 19 कोटी 55 लाख रुपये, भांडवली खर्च 58 कोटी 84 लाख रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news