राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विहिरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) चास(ता. खेड) येथे घडली. भगवान केशव काळे (वय ४४, रा. चास, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चास येथील पेट्रोल पंपाशेजारील विहिरीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मांजर पडले होते. त्याला वाचविण्यासाठी काळे कॅरेट घेवुन पाण्यात उतरले. काळे यांना पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडुन मूत्यू झाला. याबाबत ममलेश मुरलीधर वाघमोडे याने खेड पोलिस ठाण्यात माहिती दिली.
हेही वाचा;