Pune Noise Pollution: पुणेकरांच्या कानावर वर्षभर ध्वनिप्रदूषणाचा मारा; स्वारगेटमध्ये ८५.५ डेसिबलची नोंद

गणेशोत्सवापुरताच आवाजाचा प्रश्न नाही; वाहतूक, बाजारपेठा आणि बांधकामांमुळे ध्वनिपातळी निर्धारित मर्यादेपेक्षा दुप्पट
Noise Pollution
Noise PollutionPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सव, मिरवणुका किंवा सणांच्या काळातच ध्वनिप्रदूषण वाढते, हा समज महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालाने खोटा ठरविला आहे. वाहतूक, बाजारपेठा, बांधकामे आणि वाढत्या नागरीकरणामुळे पुणेकरांच्या कानावर वर्षभर मोठ्या आवाजाचा मारा सुरू असून, शहरातील अनेक भागांत निर्धारित ध्वनिमर्यादेच्या दुप्पट जवळपास ध्वनिपातळी नोंदविली जात आहे. शहरातील २२ निरीक्षण केंद्रांच्या नोंदींमध्ये व्यावसायिक क्षेत्रातील स्वारगेटने सर्वाधिक ८५.५ डेसिबलची पातळी गाठली आहे. निर्धारित ६५ डेसिबलच्या तुलनेत ही पातळी तब्बल २०.५ डेसिबलने अधिक आहे.

Noise Pollution
Pune Railway Block: पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ४२ गाड्यांच्या ९८ फेऱ्या रद्द

स्वारगेटपाठोपाठ मंडईत ८२.२, के.के. मार्केटमध्ये ७४.७ आणि पुलाचीवाडी-डेक्कन परिसरात ७४.६ डेसिबल ध्वनीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक आणि बाजारपेठांचा ध्वनिभार किती वाढला आहे, हे स्पष्ट होत आहे. ध्वनिप्रदूषणाचा तडाखा केवळ व्यावसायिक भागांनाच बसत नसून, निवासी आणि शांतता क्षेत्रांचीही परिस्थिती चिंताजनक आहे. रामोशी गेट चौकी आणि एरंडवणे येथे अनेक वेळा ध्वनिपातळी ६० डेसिबलच्या पुढे गेली. तर एनएमव्ही शाळा आणि पूना हॉस्पिटलसारख्या संवेदनशील परिसरांतही ६० ते ७२ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली.

Noise Pollution
Sugarcane Crushing Season 2026-27: ऊस गाळप हंगाम यंदा शंभर दिवसांतच आटोपण्याची शक्यता; साखर उद्योगासमोर नवे आव्हान

एप्रिल ते जून या कालावधीत विद्यापीठातील परीक्षा, डेक्कन परिसरातील आयपीएलदरम्यानची गर्दी आणि पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे ध्वनिभार वाढल्याचे अहवालातील नोंदींवरून दिसून येते. राजाराम पूल येथे ७२.३, तर रामवाडी जकात नाका येथे ७२.५ डेसिबल ध्वनिपातळी नोंदली गेली. महापालिकेकडून हरित पट्टे, ई-बस आणि मेट्रोसारख्या उपाययोजनांचा आधार घेतला जात असला, तरी प्रमुख चौकांमधील ध्वनिपातळी अद्याप नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संवेदनशील भागांत नियमित ध्वनी निरीक्षण, वाहतूक व्यवस्थापन आणि ध्वनिरोधक उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

Noise Pollution
Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एकाला अटक; कटाची माहिती असल्याचा आरोप

कायद्याने आवाजाला किती 'मर्यादा'?

  • औद्योगिक क्षेत्र : दिवसा ७५- रात्री ७० डेसिबल

  • व्यावसायिक क्षेत्र : दिवसा ६५ - रात्री ५५ डेसिबल

  • निवासी क्षेत्र : दिवसा ५५ - रात्री ४५ डेसिबल

  • शांतता क्षेत्र : दिवसा ५० - रात्री ४० डेसिबल

आवाज वाढतोय, आरोग्य धोक्यात

सातत्याने मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ताणतणाव, झोपेचा बिघाड, एकाग्रतेवर परिणाम याबरोबरच हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संदर्भानुसार रस्ते वाहतुकीच्या ध्वनीत प्रत्येक १० डेसिबल वाढीसोबत इस्केमिक हृदयरोगाचा सापेक्ष धोका सुमारे आठ टक्क्यांनी वाढू शकतो.

Noise Pollution
Pune NIV Nakshatra Supercomputer: पुण्याच्या एनआयव्हीमध्ये ‘नक्षत्र’ महासंगणक कार्यान्वित; विषाणू संशोधनाला मिळणार वेग

...हे भाग बनले 'ध्वनिहॉटस्पॉट'

  • स्वारगेट-मंडई : वाहतूक कोंडी, बाजारपेठेतील गर्दी आणि मेट्रो कामांचा परिणाम.

  • डेक्कन-पुलाचीवाडी : सततची वाहतूक आणि सुरू असलेली बांधकामे.

  • रामवाडी जकात नाका : अवजड व मालवाहतुकीमुळे वाढलेला ध्वनिभार.

  • राजाराम पूल : मालवाहतूक आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांमुळे आवाजात वाढ.

  • रामोशी गेट चौकी–एरंडवणे : निवासी भाग असूनही ध्वनिपातळी ६० डेसिबलच्या पुढे.

  • एनएमव्ही शाळा-पूना हॉस्पिटल : शांतता क्षेत्र असूनही ६० ते ७२ डेसिबलपर्यंत नोंदी.

परिसर नोंदविलेली ध्वनिपातळी

  • स्वारगेट ८५.५ डेसिबल

  • मंडई ८२.२ डेसिबल

  • के. के. मार्केट ७४.७ डेसिबल

  • पुलाचीवाडी-डेक्कन ७४.६ डेसिबल

  • रामवाडी जकात नाका ७२.५ डेसिबल

  • राजाराम पूल ७२.३ डेसिबल

  • पूना हॉस्पिटल ४३.४ डेसिबल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news