Pune News : खासगी बसला अवाच्या सवा भाडे घेतल्यास तक्रार नोंदवा

Pune News : खासगी बसला अवाच्या सवा भाडे घेतल्यास तक्रार नोंदवा

पुणे : पुढारी वृत्तेसवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे खासगी बसने आकारल्यास त्यांच्याविरोधात 8275330101 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी बसचे त्या संवर्गासाठीचे कमाल भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक राहणार नाही.

असे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केला आहे. काही खासगी प्रवासी बस सण व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स, बस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक-चालक यांनी नियमानुसार तिकीटदराची आकारणी करावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news