Pune News : धरण उशाला, कोरड घशाला!

Pune News : धरण उशाला, कोरड घशाला!
Published on
Updated on

खडकवासला ; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथे नवरात्रनंतरही भीषण पाणीटंचाईची समस्या कायम आहे. या भागातील सुमारे पन्नास हजारांवर नागरिकांना सध्या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. खडकवासला धरणावरील बंदिस्त जलवाहिनीतून कमी दाबाने पुरवठा होत असल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नांदेडचे माजी उपसरपंच रूपेश घुले यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाला निवेदनही दिले आहे. मात्र, अद्यापही नवीन कनेक्शन देण्यात आले नाही. यामुळे 'धरण उशाला, कोरड मात्र घशाला' अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत काळातील जलवाहिन्या कमी व्यासाच्या आहेत. त्यामुळे पाणी योजना कोलमडली आहे. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता परिसरातील हजारो रहिवाशांना पाण्याचे कनेक्शनही नाही. या परिसरात मोठ्या सोसायट्यांतील तसेच लोकवस्तीतील लोकांची तहान बोअरवेलच्या पाण्यावर भागवली जात आहे. तर गावठाणासह सोसायट्यांमध्ये तसेच लोकवस्त्यांत पुरेसे पाणी मिळत नाही.

ग्रामपंचायत काळात पाण्याचे समान वाटप होत होते. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यापासून वितरण व्यवस्था कोलमडली आहे. नळांना मोटर बसवून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे सखल भागासह शेवटच्या टोकाला पाणी मिळत नाही.

– रूपेश घुले, माजी उपसरपंच, नांदेड.

बंदिस्त जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे सर्व भागांत पुरेसे पाणी मिळत नाही. बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन मिळण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले आहे.
-अक्षय गावित,
शाखा अभियंता,

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news