जुन्नर तालुक्यात एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही : सकल मराठा समाजाचा इशारा | पुढारी

जुन्नर तालुक्यात एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही : सकल मराठा समाजाचा इशारा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  जोपर्यत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत जुन्नर तालुक्यात एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाचे वतीने देण्यात आला आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांना पाठिंबा म्हणून नारायणगाव येथे दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे. या साखळी उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. खोडद, झापवाडी व डिंगोरे, येनेरे, विठ्ठलवाडी, दारखीळवाडी, काले, काटेडे या भागात राजकीय नेत्यांना गावबंदी अशा प्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. “मराठा आरक्षण जोपर्यत मिळत नाही तोपर्यत कोणत्याही राजकीय नेत्यास गावात प्रवेश नाही, आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढा जातीसाठी” असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जुन्नर तालुक्यात मोठा पाठिंबा सकल मराठा समाजाला मिळताना दिसत आहे.

हेही वाचा :

Back to top button