

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा करीत आहोत. आघाडीतील घटकपक्षांसोबत यासंदर्भात आज उशिरा बैठक होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काँग््रेासचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आघाडी म्हणून पुणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे, तर राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाचे नेते ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप, अशी आज बैठक झाली.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत मिळून निवडणूक लढविण्याबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली आहे. मित्रपक्षांच्या प्रमुखांशीही बोलणार आहोत. हा निर्णय स्थानिक पातळीवरील आहे. राष्ट्रवादी काँग््रेास एकत्रित लढल्यावर कोणत्या चिन्हावर लढायचे, हा निर्णय वरिष्ठस्तरावर घेतला जाईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले.
जगताप आमच्यासोबत राहतील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. आज त्यांना बैठकीला बोलावले होते. ते मुंबईला असल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत. पक्षाचे वरिष्ठ नेते जगताप यांच्याशी संवाद साधत आहेत. ते आमच्यासोबत राहतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
आज भूमिका मांडणार
राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी साडेतीन तास चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शिंदे आणि सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आज कुठलाही निर्णय झालेला नाही. चर्चेअंती आपली भूमिका आज बुधवारी (दि. 24) सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातील पक्ष कार्यालयात मांडणार आहे.