Pune Municipal Junior Engineer Exam: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा जाहीर; 169 जागांसाठी 42 हजार उमेदवार

22, 23 व 29 एप्रिलला परीक्षा; राज्यातील सात केंद्रांवर आयोजन, गैरप्रकार टाळण्यासाठी कडक व्यवस्था
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 169 जागांसाठी दोन वेळा रखडलेल्या भरती परीक्षेला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सात केंद्रांवर 22, 23 व 29 एप्रिलला ही परीक्षा दोन आणि एका सत्रात घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 42 हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Revenue Officers: पुण्यात महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत; कलम 155 गैरवापर प्रकरण

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने बांधकाम, पथ, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, प्रकल्प आदी विभागांतील कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीला प्राधान्य दिले जात आहे. यापूर्वी महापालिकेत 135 कनिष्ठ अभियंत्यांची भरती झाली आहे. त्यानंतर आता 169 पदांची भरती करण्यासाठी अर्ज मागविले होते. पण, प्रशासनाच्या संथ प्रक्रियेमुळे पावणेदोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे.

Pune Municipal Corporation
Pune Crime: पुणे ग्रामीण हादरले; बारामतीत अटक आरोपींकडून साखळी खुनांचा उलगडा

त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत ही भरती प्रक्रिया रद्द केली होती, तर त्यांतर परीक्षार्थींच्या विरोधामुळे ही परीक्षा पुन्हा रद्द केली होती. मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिकमध्ये ही परीक्षा 22, 23 व 29 एप्रिलला पार पडणार आहे. 22 व 23 तारखेला 2 सत्रात, तर 29 तारखेला 3 सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे. ‌‘आयबीपीएस‌’च्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविली जात असून, याची पूर्ण तयारी केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.

Pune Municipal Corporation
Pune Crime: पुण्यात धक्कादायक घटना; वडगाव बुद्रुकमध्ये अल्पवयीन टोळीचा गोळीबार

169 जागांसाठी 42 हजार अर्ज

कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त 169 जागांसाठी 42 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी सुमारे साडेआठ हजार अर्ज हे पुणे शहरातील आहेत. उर्वरित अर्ज राज्यभरातून आल्याने राज्यातील सात केंद्रांवर परीक्षा पार पाडली जाणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune RTO Revenue: पुणे आरटीओची दमदार कामगिरी; 1922 कोटी महसूल वसुली, 101% उद्दिष्टपूर्ती

गैरप्रकार टाळण्यासाठी एका खोलीत दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती

ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यासाठी एका खोलीत 100 परीक्षार्थींच्या मागे दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, तर दिव्यांग परीक्षार्थींसाठी देखील विशेष व्यवस्था केली जाणार आहे. या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त देखील ठेवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news