Pune Crime: पुणे ग्रामीण हादरले; बारामतीत अटक आरोपींकडून साखळी खुनांचा उलगडा

प्रेयसी व तिच्या मुलासह अनेकांची हत्या; मृतदेह जाळून पुरावे नष्ट केल्याचे तपासात उघड
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

पुणे/ बारामती: किरकोळ कारणातून झालेल्या वादात एकाचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. त्यातील एकाकडे चौकशी केली तेव्हा त्याच्या क्रौर्याचा असा काही प्रकार समोर आली की, थोड्या वेळासाठी पोलिसही चक्रावून गेले. प्रेयसीच्या मुलाचा त्याने डोक्यात रॉड घालून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह मंचर परिसरात जाळून त्याची राख घोडनदीत टाकून दिली. त्यानंतर प्रेयसीचा देखील खून कला.

Murder
Pune Crime: पुण्यात धक्कादायक घटना; वडगाव बुद्रुकमध्ये अल्पवयीन टोळीचा गोळीबार

खेड तालुक्यातील जैदवाडी येथे गेल्या महिन्यात धनंजय मारुती घेवडे (वय 33, रा. राक्षेवाडी, ता. खेड, मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पुणे ग््राामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा, खेड आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन आरोपींना बारामती तालुक्यात अटक केली. त्यांनी आणखी दोन खून केल्याचे आता तपासात पुढे आले. ललित दीपक खोल्लम (वय 38, रा. शिरोली, शिंदेवस्ती, ता. खेड) व नंदलाल दिलीप होले (वय 31, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. खोल्लम सराईत आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे तब्बल 35 गुन्हे सातारा, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरात दाखल आहेत.

Murder
Pune RTO Revenue: पुणे आरटीओची दमदार कामगिरी; 1922 कोटी महसूल वसुली, 101% उद्दिष्टपूर्ती

खेड तालुक्यातील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. घटनास्थळ अत्यंत दुर्गम भागात असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिले असता, त्यात खोल्लम व त्याचा एक साथीदार दिसून आला. त्याचे नाव नंदलाल असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी 110 कॅमेरे तपासले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना पाठलाग करून पकडले.

Murder
Pune FDA Adulterated Mango Pulp Raid: पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

घेवडेचा गेम

घेवडे याच्यासोबत नंदलाल, नीलेश यांचा वाद झाला होता. त्या वादातून खोल्लम व होले यांनी घेवडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगड मारून खून केल्याचे कबूल केले. नीलेश सणस याने त्यांना पैसे पुरवल्याचे तपासात पुढे आले. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सुभाष चव्हाण, सपोनि नागनाथ राख, उपनिरीक्षक अभिजित सावंत, कर्मचारी दीपक साबळे, संदीप वारे, हेमंत विरोळे यांच्या पथकाने केली.

Murder
Pune Auto Rickshaw Meter: पुण्यात रिक्षा मीटर विरुद्ध ॲप दर वाद चिघळला; संघटनांचा आक्रमक पवित्रा

प्रेयसीसह मुलाचाही काढला काटा

खोल्लमने श्रीकांत विलास वाडेकर (वय 26, रा. शिरोली) याचाही खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. रूपाली विलास वाडेकर या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून ही घटना घडली होती. हे दोघे त्याच्याकडे पैशांची मागणी करीत होती. त्यातून त्याने तिचा मुलगा श्रीकांतला ठाणे येथून शिरोली येथे बोलावून घेतले होते. तेथे श्रीकांतचे अपहरण करत त्याला एका फ्लॅटवर नेत लोखंडी रॉडने मारून त्याचा खून केला होता. नंदलाल याच्या मदतीने तो मृतदेह मंचर परिसरात नेऊन जाळून टाकला होता. राख गोळा करून घोडनदीत टाकली. हा गुन्हा ठाणे शहरात दाखल आहे. त्यानंतर रूपाली वाडेकर यांनी खोल्लम याला माझा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने तिलाही ठाण्यातून बोलावून घेत तिचाही काटा काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news