Pune Crime: पुण्यात धक्कादायक घटना; वडगाव बुद्रुकमध्ये अल्पवयीन टोळीचा गोळीबार

17 वर्षीय तरुण जखमी; पाच जण ताब्यात, सिंहगड रोड पोलिसांकडून तपास सुरू
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

पुणे: ‌‘आज तुमचा विषयच संपवतो,‌’ अशी धमकी देत अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळीने भर रस्त्यात एका मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथील चरवडवस्तीमध्ये घडली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात 17 वर्षीय तरुण जखमी झाला असून, त्याच्या साथीदारावरही गोळी झाडण्यात आली. मात्र, सुदैवाने तो बचावला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. 7) रात्री ही घटना घडली. याबाबत एका 17 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

Guns
Pune RTO Revenue: पुणे आरटीओची दमदार कामगिरी; 1922 कोटी महसूल वसुली, 101% उद्दिष्टपूर्ती

फिर्यादी व त्याचे मित्र मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना चरवडवस्ती येथील मोकळ्या मैदानाजवळ आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून आरोपींनी फिर्यादीला पाहताच शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींनी लोखंडी शस्त्रांनी वार करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Guns
Pune FDA Adulterated Mango Pulp Raid: पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

हाणामारी सुरू असतानाच एका आरोपीने कमरेतील पिस्तूल काढून फिर्यादीवर गोळीबार केला. पिस्तुलामधून सुटलेली गोळी फिर्यादीच्या मांडीत लागून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तसेच, फिर्यादीच्या मित्रालाही ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्याने मोठा अनर्थ टळला. सहायक निरीक्षक समीर करपे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news