Pune Municipal Hospital Medicine Issue: पुणे महापालिका दवाखान्यांचा धक्कादायक कारभार! कफ सिरपसाठी रुग्णांकडून आणल्या जात होत्या बाटल्या, मलम कागदात

एफडीएच्या तपासणीत असुरक्षित औषध वितरणाचा प्रकार उघड; ६० हून अधिक दवाखाने आणि रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना औषधे देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित पद्धतीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गंभीर आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये कफ सिरपसाठी रुग्णांना घरून बाटल्या आणायला लावणे आणि मलम कागदात गुंडाळून देणे, हा धक्कादायक प्रकार एफडीएच्या तपासणीत उघड झाला आहे. या अस्वच्छ आणि चुकीच्या पद्धतीमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट करीत एफडीएने महापालिकेला ही पद्धत तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Flood Rehabilitation: घोषणा हवेतच! सिंहगड रस्त्यावरील १,३८३ कुटुंबांचे पुनर्वसन रखडले; ३०० कोटींचा पूरप्रतिबंधक प्रकल्पही मंत्रालयात अडकला

एफडीएच्या औषध विभागाने नुकतीच सहकारनगर येथील शिवशंकर पोटे दवाखाना आणि मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात अचानक तपासणी केली. या तपासणीत औषध वितरणाची ही धक्कादायक पद्धत समोर आली. केवळ दोनच दवाखाने नव्हे, तर महापालिकेचे ६० हून अधिक बाह्यरुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे आणि दोन रुग्णालयांमध्ये हीच पद्धत वर्षानुवर्षे सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Pune Municipal Corporation
Shravani Kudale NEET 2026: दररोज 6 तास अभ्यास, युट्यूबऐवजी पुस्तकांवर भर; नीटमध्ये बाजी मारणाऱ्या श्रावणीचा पुढचा प्लान काय?

रुग्ण घरून बाटल्या किंवा डब्या आणतात; मात्र त्या निर्जंतुक असतीलच, याची खात्री नसते. अशा असुरक्षित बाटल्यांमध्ये कफ सिरप भरून देणे किंवा मलम कागदात देणे, यामुळे औषधांचे दूषितीकरण होऊन रुग्णांचे गंभीर नुकसान होऊ शकते. हा प्रकार औषध नियमावलीविरोधात असल्याचे एफडीएने म्हटले आहे.

Pune Municipal Corporation
Sant Tukaram Maharaj Palkhi: इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुसरे गोल रिंगण उत्साहात; अश्वांच्या टापांनी भक्तीचा रंग चढला

या प्रकारानंतर महापालिका आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. यापुढे औषधे पॅकबंद किंवा स्वच्छ बाटल्या व डब्यांमध्येच दिली जातील, याची खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. याबाबत गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध भांडारला कळविण्यात येणार आहे.

डॉ. सुनील आंधळे, प्रभारी वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी

Pune Municipal Corporation
MBA MMS Admission 2026: MBA/MMS प्रवेशासाठी CET Cell कडून मुदतवाढ; नोंदणीची अंतिम तारीख १९ जुलै, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

तपासणीत कोणतीही मुदतबाह्य औषधे आढळली नाहीत. वितरण पद्धती अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित होती. सध्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, एफडीएचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

गिरीश हुकरे, सह आयुक्‍त, अन्‍न व औषध विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news