Shravani Kudale NEET 2026: दररोज 6 तास अभ्यास, युट्यूबऐवजी पुस्तकांवर भर; नीटमध्ये बाजी मारणाऱ्या श्रावणीचा पुढचा प्लान काय?

Marathi Medium Students Success Stories: मराठी माध्यमातून शिक्षण घेत सहा तासांचा नियमित अभ्यास; मोबाईल-टीव्हीपासून दूर राहून मिळवले घवघवीत यश
Shravani Kudale
Shravani KudalePudhari
Published on
Updated on

NEET 2026 Results Maharashtra Topper Shravani Kudale

खोर: नीट परीक्षेत देशात पाचवा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवणारी खडकी (ता. दौंड) येथील श्रावणी कुदळे हिला दिल्ली येथील एम्स कॉलेजमध्ये एमबीबीएस करायचे आहे. या कॉलेजचा कट ऑफ ७०५ ते ७२० असतो. एमबीबीएसनंतर स्पेशलायझेशन भविष्यातील आवडीवर अवलंबून राहणार राहील, असे तीने मत व्यक्त केले.

Shravani Kudale
Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory: कुरकुंभ एमआयडीसीत विषारी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३४२० किलो क्लोरल हायड्रेट जप्त

मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या श्रावणीच्या 'नीट'मधील यशामुळे दौंड, बारामती तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. लहानपणी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या श्रावणीने सातवी आठवीपासूनच डॉक्टर होण्याची ठरवले होते. मोठी बहीण वृषाली ही 'बीएएमएस'चे शिक्षण घेत आहे. छोटा भाऊ मयुरेश पाचवीत शिकत आहे. बहिणीची प्रेरणा घेत तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

Shravani Kudale
Akshar Wari: ज्ञानेश्वरीत विज्ञानाची बीजे? गुरुत्वाकर्षणापासून गतीच्या नियमांपर्यंत माऊलींचे विचार

दररोज नियमित क्लास सोडून सहा तास अभ्यास केला. अभ्यासासाठी ‌सलग दोन वर्ष चित्रकला, पर्यटन हे छंद बाजूला ठेवले. तसेच कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमापासून दूर राहिली. घरातील टीव्ही बंद ठेवला. मोबाईलचा वापर टाळला. अकॅडमीमध्ये अभ्यास करताना आलेल्या अभ्यासातील शंका त्याच दिवशी शिक्षकांकडून सोडवून घेतल्या. तसेच 'युट्यूब'पेक्षा पुस्तकातून अभ्यास करण्यावर भर दिला.

Shravani Kudale
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५८ टक्क्यांवर; पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याचा दिलासा

गेल्या वर्षी श्रावणीच्या क्लासमधील सिद्धी बडे या विद्यार्थिनीला एअर-२६ वी रँक मिळाली. त्यामुळे सिद्धीची प्रेरणा घेत आपणही नंबर मिळू शकतो, असा आत्मविश्वास तिला आला. यापूर्वी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विचलीत न होता नियमित अभ्यास केला. श्रावणीचा खडकी येथे नागरी सत्कार आयोजित केला जाईल अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

पालकांनी गाव सोडले

प्राथमिक शिक्षक असणाऱ्या श्रावणीचे आईवडील यांनी तिच्या शिक्षणासाठी खडकी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. हे दाम्पत्य बारामती स्थायिक झाले. तेथे श्रावणीला खासगी कोचिंग क्लास लावले. त्यानंतर बारामतीपासून दररोज दौंड तालुक्यात नोकरीसाठी धावपळ केली.

Shravani Kudale
Wagholi Water Supply Project: वाघोलीच्या ७ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; २३ कोटींच्या पाणी योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल

घरातून शिक्षणाचं बाळकडू

वडील कृष्णा कुदळे यांना राज्य शासनाचा २०१९ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सुंदर हस्ताक्षर, देशी व विदेशी चलनांचा संग्रह, खडकी येथे ग्रंथालय हे उपक्रम त्यांनी राबवले. आई जयश्री कुदळे व कृष्णा कुदळे यांच्या अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले आहे. श्रावणीचे आजोबा खंडू कुदळे यांनी टेलरिंग काम करत कुदळे परिवाराचा प्रपंच उभा केला‌. या परिवाराला खडकी येथे एक एकर जमीन व स्वतःचे घर आहे.

यापूर्वी रद्द झालेली नीट परीक्षा तुलनेने सोपी होती. या परीक्षेचा माझा स्कोर ७१५ येत होता. यश मिळेल याचा विश्वास होता. मिळालेले यश खडकी ग्रामस्थ, माझे कुटुंबीय, आई वडील व मार्गदर्शक शिक्षकांना समर्पित करते.

श्रावणी कुदळे, (नीट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news