Pune Municipal Health Services: पुणे महापालिकेच्या आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह

कोट्यवधी खर्च करूनही रुग्णालये अपुरी; आरोग्य कार्यकर्त्यांची तीव्र टीका
Health
HealthPudhari
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आरोग्य सुविधांच्या घोषणांचा गाजावाजा केला असला, तरी सध्याच्या अनेक आरोग्यसेवा पूर्णक्षमतेने कार्यरत नाहीत. त्यामुळे उपलब्ध सेवा कार्यक्षम करण्याऐवजी महापालिका ‌‘हातचे सोडून पळत्याच्या मागे‌’ धावत आहे. महापालिकेचा हा उरफाटा कारभार असल्याची टीका आरोग्य कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Health
Mula Mutha River Violation: मुळा-मुठा नदीपात्रात राडारोड्याचा धुमाकूळ

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. यात कमला नेहरू आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयांचे आधुनिकीकरण व विस्तार, सहा प्रसूतिगृहांचे उन्नतीकरण, पाच रुग्णालयांना आयसीयू, एनआयसीयू आणि प्रगत नर्सिंग सेवांसह मल्टिस्पेशालिटी सुविधांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत कर्करोग रुग्णालय उभारण्याची योजना, गंगाधाम परिसरात एमआरआय व सीटी स्कॅन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तसेच आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या दरात आयव्हीएफ सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालय वगळता महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात आयसीयू सेवा उपलब्ध नाहीत.

Health
Ambegaon Mango Crop Damage: आंबेगावात उष्णतेचा कैऱ्यांवर परिणाम

महापालिकेची बहुतांश तपासणी केंद्र पीपीपी तत्त्वावर सुरू आहेत. रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि आवश्यक उपकरणांची कमतरता जाणवत आहे. केवळ सहा प्रसूतिगृहांमध्ये सिझेरियन प्रसूतीची सोय आहे. उच्च जोखमीच्या गर्भवतींना ससून रुग्णालयात रेफर केले जाते. प्रथम आणि द्वितीय स्तरावरील आरोग्य सुविधा सुरळीतपणे चालविण्यात आणि गुणवत्ता वाढविण्यात महापालिकेला अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत सध्याची परिस्थिती सुधारणे आवश्यक असताना नवीन आरोग्यसेवांचा पाठलाग करणे व्यर्थ असल्याचे दिसून येत आहे.

Health
Baner Water Problem: बाणेर-बालेवाडीमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न

महापालिकेच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित

कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधा व्यवस्थित कार्यान्वित नसताना नव्या प्रकल्पांची घोषणा करणाऱ्या महापालिकेच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बोपोडी येथील चारमजली संजय गांधी रुग्णालय बांधूनही अद्याप वापरात आलेले नाही. याशिवाय होमी भाभा, माँ खादीजा दवाखाना, बाबूराव शेवळे, लेट मुरलीधर लायगुडे, दळवी, सोनवणे, खराडी आणि कोंढवा येथील महापालिकेची रुग्णालयेही पूर्णक्षमतेने कार्यरत नाहीत.

Health
Patas Fire Incident: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग

कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांची पदे भरण्यात आली आहेत. तसेच, रुग्णालयांचे टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण केले जाणार आहे. अद्याप आरोग्य सुविधांच्या घोषणांचा सविस्तर आराखडा समोर आलेला नाही. अंदाजपत्रकाचा पूर्ण अभ्यास केल्यावर याबाबत बोलणे शक्य होईल.

डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news