Ambegaon Mango Crop Damage: आंबेगावात उष्णतेचा कैऱ्यांवर परिणाम

कडक उन्हामुळे कैऱ्या गळून उत्पादनावर संकट; शेतकरी चिंतेत
Raw Mango
Raw MangoPudhari
Published on
Updated on

पारगाव: आंबेगाव तालुक्यात वाढलेल्या कडक उन्हाचा मोठा फटका कैऱ्यांच्या उत्पादनाला बसू लागला आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने झाडांवरील कैऱ्या पिवळट होत गळून खाली पडत आहेत. या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या हंगामातील उत्पन्नावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Raw Mango
Baner Water Problem: बाणेर-बालेवाडीमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न

तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या बांधांवर आंब्यांच्या विविध जातींची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. दरवर्षी कैऱ्यांची विक्री ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा हंगामी उत्पन्नाचा स्त्रोत ठरतो. कैऱ्यांपासून लोणचे, पन्हे, कच्चा माल यासाठी मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगले दरही मिळतो. त्यानंतर येणाऱ्या पिकलेल्या आंब्यांच्या विक्रीतूनही चांगले अर्थार्जन होते.

Raw Mango
Patas Fire Incident: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग

यंदा मात्र कैऱ्यांना उष्णतेचा प्रचंड तडाखा बसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अनेक कैऱ्या पिवळसर पडून वेळेआधीच गळत आहेत. काही ठिकाणी जमिनीवर पडलेल्या कैऱ्या उष्णतेमुळे लगेच खराब होत असल्याने त्याचा विक्रीवरही प्रतिकूल परिणाम दिसत आहे. आंबा उत्पादक देवराम टेमगिरे यांनी सांगितले की, उन्हाळ्याची तीवता एवढ्या प्रमाणात वाढेल असे वाटले नव्हते. कैऱ्यांची वाढ व्यवस्थित होत असतानाच कडक उन्हामुळे गळती वाढू लागली आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पन्न घटणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news