Patas Fire Incident: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग

आगीत ट्रक जळून खाक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Patas Fire Incident
Patas Fire IncidentPudhari
Published on
Updated on

पाटस: पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे सव्वा दहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. दोन अग्निशामक गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Patas Fire Incident
Pune Bribery Case: पुण्यात वन विभागातील कर्मचाऱ्याला 4 लाखांची लाच घेताना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या परिसरातील बगॅसला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. यावेळी घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि पाहता पाहता पूर्ण जळून खाक झाला. कारखान्याच्या दक्षिण दिशेला बगॅसचा मोठा साठा जमा असतो.

Patas Fire Incident
Pune Vegetable Market: पुणे बाजारात मटारचे दर वाढले; आवक घटली

त्याच कारखान्याच्या संरक्षण भिंत बाहेरून मोटेवाडाकडील रोड, शेती व कारखाना शाळा आहे. ही आग लागल्याने त्या परिसरात नागरिकांची धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक पूर्णपणे जाळून खाक झाला व बगॅस ही खाक होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण काय, हे अजून समजले नाही याबाबत तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news