Pune Municipal Corporation Ward Committees: पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांवर ४५ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती

बिगर सरकारी व स्वयंसेवी संस्थांना संधी; ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर बिगर सरकारी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची (स्वीकृत सदस्य) नियुक्ती करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कमाल तीन प्रतिनिधी नियुक्त करण्याचा प्रस्ताव असून, महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांसाठी एकूण ४५ प्रतिनिधींची नियुक्ती होणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune University Girls Hostel: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात रूमवरून वाद; तीन विद्यार्थिनींना बाहेर काढल्याचा आरोप

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ नुसार महापालिका हद्दीत एकूण ४१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. हे प्रभाग १५ क्षेत्रीय कार्यालयांशी संलग्न केले असून, संबंधित क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने बिगर सरकारी संस्था आणि समाजलक्षी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची तरतूद आहे.

Pune Municipal Corporation
Pune Dhol Tasha Pathak: ढोल-ताशा पथकांना महापालिकेच्या जागा द्या; पण रेडीरेकनरनुसार भाडे आकारा

या प्रतिनिधींची नियुक्ती करताना संबंधित संस्था आणि सदस्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित संस्था मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५० किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच नामनिर्देशनाच्या तारखेपूर्वीच्या तीन वर्षांचे धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेले लेखापरीक्षणाचे विवरणपत्र आणि संस्थेच्या कामाचा अहवाल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Pune Municipal Corporation
Pune Akhad: पुणेकरांनी आखाडात उठवला मांसाहाराचा फडशा; ७०० टन चिकनची विक्री

याशिवाय, नगरपालिका कार्यांशी संबंधित किमान एका प्रकल्पाचे काम संबंधित संस्थेने मागील तीन वर्षांत पूर्ण केलेले असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री अस्तित्व असलेल्या संस्थांऐवजी प्रत्यक्ष सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील प्रभागामध्ये संबंधित सदस्याचा मतदार म्हणून नोंद असणे, तसेच संबंधित सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसणे किंवा केंद्र अथवा राज्य शासन, महापालिका अथवा नगरपरिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत नसणे, असेही निकष प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Organ Donation: ४८ अवयवदात्यांनी दिले १२६ जणांना जीवनदान; तरीही हजारो रुग्ण प्रतीक्षेत

४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांसाठी सदस्यांच्या नियुक्तीसाठी १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयात अर्ज मिळणार आहेत. हे अर्ज दि. ४ सप्टेंबरपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करायचे आहेत. त्यानंतर त्यांची पडताळणी होऊन प्रभाग समिती सदस्य नेमणुकीची प्रक्रिया करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news