Pune Food Testing Machine Missing: ११.९८ लाखांची फूड टेस्टिंग मशीन गायब; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा धक्कादायक कारभार

भेसळविरोधी कारवाईला वेग येत असताना महापालिकेची निष्काळजीपणा उघड; मशीनसह महत्त्वाचा भागही बेपत्ता
Food Testing Machine Missing
Food Testing Machine MissingPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी कारवाईला वेग आला असताना, महापालिकेच्या आरोग्य विभागातील धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. तब्बल ११ लाख ९८ हजार रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीन गायब असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या जुलै महिन्यातील प्रश्नोत्तरातून उघड झाले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Food Testing Machine Missing
Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory: कुरकुंभ एमआयडीसीत विषारी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३४२० किलो क्लोरल हायड्रेट जप्त

महापालिकेच्या आरोग्य विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुमारे ११.९८ लाख रुपये खर्चून फूड टेस्टिंग मशीन खरेदी केली होती. ही मशीन फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरी, कोंढवा येथे कार्यरत होती. संबंधित प्रयोगशाळेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन पशुवैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आला होता.

Food Testing Machine Missing
Akshar Wari: ज्ञानेश्वरीत विज्ञानाची बीजे? गुरुत्वाकर्षणापासून गतीच्या नियमांपर्यंत माऊलींचे विचार

महापालिकेच्या सभेत नगरसेवक महेश वाबळे यांनी फूड टेस्टिंग मशीन सध्या कार्यरत अवस्थेत आहे का, तसेच मशीनचे सर्व भाग उपलब्ध आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात फूड टेस्टिंग मशीनच आढळून येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मशीनसह तिचा एक महत्त्वाचा भागही गायब झाल्याचे नमूद करत, याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Food Testing Machine Missing
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५८ टक्क्यांवर; पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याचा दिलासा

दरम्यान, या मशीनचे स्पेअर पार्ट्स साधारणतः एक वर्षापर्यंतच उपलब्ध असतात. संबंधित प्रयोगशाळा २०१९ ते २०२२ या कालावधीत प्रशासकीय कारणास्तव बंद राहिल्याने मशीनचे स्पेअर पार्टस नष्ट करण्यात आल्याचेही प्रशासनाने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

Food Testing Machine Missing
Wagholi Water Supply Project: वाघोलीच्या ७ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; २३ कोटींच्या पाणी योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल

मात्र, लाखो रुपयांची सार्वजनिक मालमत्ता नेमकी कशी गायब झाली, त्यासाठी जबाबदार कोण, तसेच या प्रकरणाची चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत प्रशासनाने कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मालमत्ता व्यवस्थापन आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news