Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory: कुरकुंभ एमआयडीसीत विषारी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३४२० किलो क्लोरल हायड्रेट जप्त

१५ लाख लिटर विषारी दारू निर्मितीचा डाव उधळला; अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई
Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Kurkumbh MIDC Toxic Liquor FactoryPudhari
Published on
Updated on

पांढरेवाडी: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत विषारी व बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश केला आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५८ टक्क्यांवर; पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याचा दिलासा

समर्थ लॅबोरेटरीजच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध कारखान्यावर छापा टाकून तब्बल ३४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे ५८०० लिटर कच्चे केमिकल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Wagholi Water Supply Project: वाघोलीच्या ७ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; २३ कोटींच्या पाणी योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुमारे दीड महिन्यापासून या ठिकाणी गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संशयित ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ व रसायने आढळून आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नबी सरवर जमीर सिद्दीकी (वय ४०) आणि आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात ही अवैध फॅक्टरी चालविली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Engineering Admission 2026 Schedule: अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी सेलचे वेळापत्रक जाहीर; नोंदणीची मुदत १९ जुलैपर्यंत

१५ लाख लिटर विषारी दारू निर्मितीची क्षमता

पुणे येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जप्त करण्यात आलेला पदार्थ क्लोरल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रसायनाचा वापर विषारी व बनावट दारू तयार करण्यासाठी केला जातो. पोलिसांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या ३४२० किलो क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार होऊ शकली असती.

या ठिकाणी उत्पादनासाठी वापरली जाणारी सेंट्रिफ्यूगल आणि जीएलआर मशीन देखील जप्त करण्यात आली आहेत. या यंत्रसामग्रीची किंमत अंदाजे १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मुख्य आरोपी किशोर सुर्वे याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जप्त करण्यात आलेली रसायने शैलेश ठाकूर याने तयार केल्याचेही प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Pune Waste Processing Project Tipping Fee: पुणे कचरा प्रकल्पाच्या ९४३ रुपये टिपिंग शुल्काला ब्रेक; महापालिकेने भूमी ग्रीनला दिली दर कमी करण्याची सूचना

राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई अपर पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग), विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोल्हापूर कृती विभागाच्या पोलिस अधिकारी व पुणे ग्रामीण पोलिसांनी तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. कुरकुंभ एमआयडीसी परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पदार्थांच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news