Pune Illegal Construction Demolition: पुणे महापालिकेचा बुलडोझर पुन्हा धडाडला; लोहगाव-खराडीत २१ हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

बेकायदा प्लॉटिंग आणि विनापरवाना बांधकामांवर कठोर कारवाई; नागरिकांना भूखंड खरेदीत सावध राहण्याचे आयुक्तांचे आवाहन
Pune Illegal Construction Demolition
Pune Illegal Construction DemolitionPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला पुन्हा तीव्र केली आहे. मंगळवारी लोहगाव आणि खराडी परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सुमारे २१ हजार ४०० चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम पाडून जमीनदोस्त केले. नव्याने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेल्या बेकायदा प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही कारवाई केली.

Pune Illegal Construction Demolition
Pune Andekar Gaikwad Gang Terror: आंदेकर टोळीवर हल्ल्याचा कट उधळला; पोलिस वाहनावर गोळीबार करून खुनाचा डाव फसला

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली सकाळी नऊ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. लोहगाव येथील निंबाळकरनगर, सर्व्हे क्रमांक २९४ तसेच खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत बांधकाम विकास विभागाचे अधिकारी आणि अभियंतेही सहभागी होते.

Pune Illegal Construction Demolition
Pune Public Toilets Repair: पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा बदलणार चेहरा; स्वच्छता आणि दुरुस्तीची जबाबदारी एकाच ठेकेदाराकडे

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. या भागांमध्ये बांधकामासाठी नियमानुसार महापालिकेची परवानगी आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी परवानगीशिवाय बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मजले उभारण्याचे प्रकार वाढल्याने अशा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Pune Illegal Construction Demolition
Maharashtra Engineering Admission Fee: अभियांत्रिकी प्रवेश शुल्कवाढीचा निर्णय मागे; CET सेलने विद्यार्थ्यांना दिला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई मंदावल्याची चर्चा होती. मात्र, आता ही मोहीम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली असून, नियमबाह्य बांधकामांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी महापालिकेचे दोन पोलीस अधिकारी, १३ पोलीस कर्मचारी, ३५ एमएसएफ जवान, पाच जेसीबी, सहा गॅसकटर, सात ब्रेकर आणि २५ बिगारी सेवकांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

Pune Illegal Construction Demolition
Pune RTE Admission Inquiry: पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश गैरप्रकारांची चौकशी होणार; खेडपुरती मर्यादा न ठेवण्याचा निर्णय

बेकायदा प्लॉटिंगपासून सावध राहण्याचे आवाहन

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्लॉटिंग करून भूखंडांची विक्री केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही बेकायदेशीर भूखंडाची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news