Maharashtra Engineering Admission Fee: अभियांत्रिकी प्रवेश शुल्कवाढीचा निर्णय मागे; CET सेलने विद्यार्थ्यांना दिला मोठा दिलासा

जागा स्वीकृती शुल्क पूर्वीप्रमाणेच १ हजार रुपये राहणार; शुल्कवाढीविरोधातील निवेदनांनंतर सीईटी कक्षाचा निर्णय
CET
CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करून यात वाढ केली होती. परंतु, विविध संघटनांकडून आलेले निवेदने व शासनाकडून आलेल्या सूचनेच्या आधारावर संबंधित शुल्कवाढ न करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यामुळे अखेर सीईटी सेल नरमले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

CET
Pune RTE Admission Inquiry: पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश गैरप्रकारांची चौकशी होणार; खेडपुरती मर्यादा न ठेवण्याचा निर्णय

मागील सात ते आठ वर्षांपासून सीईटी कक्षाने जागा स्वीकृती शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. तसेच अनावश्यकपणे जागा रोखून धरण्याचे प्रमाण कमी करणे आणि खऱ्या अर्थाने इच्छुक विद्यार्थ्याला प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश होता. मागील वर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास अशा ३५ हजार जागा रोखून धरल्या होत्या, असे दिसून आले होते.

CET
Pune RPI Protest: अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाचा पुण्यात महामोर्चा; जातनिहाय जनगणनेची मागणी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून तंत्रशिक्षण विभागांतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्यात येणार होती. यानुसार विद्यार्थ्याला केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियामधील एकूण चार फेऱ्यांमध्ये कितव्यांदा जागावाटप झाल्यानंतर जागा स्वीकृती शुल्क आकारण्यात येणार होते.

CET
Pune Zilla Parishad Meeting Incident: पुणे जिल्हा परिषद सभेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पेट्रोलची बाटली काढून..... मोठा अनर्थ टळला

यानुसार जागा स्वीकृती शुल्क प्रथमच जागावाटप झाल्यास एक हजार रुपये, सुधारणा प्रक्रियेद्वारे दुसऱ्यांदा नवीन जागावाटप होऊन ती स्वीकारल्यास दोन हजार रुपये व सुधारणा प्रक्रियेद्वारे तिसऱ्यांदा नवीन जागावाटप होऊन ती स्वीकारल्यास रुपये तीन हजार रुपये आकारण्यात येणार होते.

CET
Maharashtra Direct Second Year Admission: पदविका निकाल प्रलंबित विद्यार्थ्यांना दिलासा; थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी CET कक्षाची विशेष संधी

ही शुल्कवाढ न करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. यामुळे आता विद्यार्थ्याला जागा स्वीकृती शुल्क पूर्वीप्रमाणेच एक हजार रुपयेच राहणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news