Pune Andekar Gaikwad Gang Terror: आंदेकर टोळीवर हल्ल्याचा कट उधळला; पोलिस वाहनावर गोळीबार करून खुनाचा डाव फसला

गायकवाड टोळीच्या साथीदारांसह पाच जणांवर गुन्हा; शिवाजीनगर-चाकण मार्गाची केली होती रेकी, गुन्हे शाखेची कारवाई
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on
Updated on

पुणे: नाना पेठेतील आंदेकर-गायकवाड टोळीतील रक्तरंजित वर्चस्वाच्या संघर्षाने आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी नंदूरबार कारागृहातून पुण्यात आणण्यात आलेल्या कुख्यात कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर पोलिस वाहनावरच गोळीबार करून त्याचा खून करण्याचा कट गुन्हे शाखेने उधळून लावला आहे.

Gun Firing
Pune Public Toilets Repair: पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा बदलणार चेहरा; स्वच्छता आणि दुरुस्तीची जबाबदारी एकाच ठेकेदाराकडे

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ गायकवाड टोळीचा साथीदार सूरज अशोक ठोंबरे याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूरज ठोंबरे (रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले, वेदांत रोहित सावंत, धीरज लखारा (तिघे रा. धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (रा. गुजरवाडी, कात्रज) यांच्यासह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Gun Firing
Maharashtra Engineering Admission Fee: अभियांत्रिकी प्रवेश शुल्कवाढीचा निर्णय मागे; CET सेलने विद्यार्थ्यांना दिला मोठा दिलासा

गुन्हे शाखेच्या युनिट-दोनच्या पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आंदेकर आणि गायकवाड टोळीतील संघर्ष अधिकच चिघळला होता. त्यानंतर सुडाच्या मालिकेत आयुष कोमकर, गणेश काळे यांच्या हत्या, तसेच दोन महिन्यांपूर्वी अक्षय काळेवरील गोळीबार अशा सलग खुनी हल्‍ल्‍यांनी शहर हादरले होते.

Gun Firing
Pune RTE Admission Inquiry: पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश गैरप्रकारांची चौकशी होणार; खेडपुरती मर्यादा न ठेवण्याचा निर्णय

सध्या मकोकाअंतर्गत नंदूरबार कारागृहात असलेल्या बंडू आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. याच प्रवासादरम्यान पोलिस वाहनाचा पाठलाग करून गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

Gun Firing
Pune RPI Protest: अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाचा पुण्यात महामोर्चा; जातनिहाय जनगणनेची मागणी

तपासात आरोपींनी शिवाजीनगर ते चाकण या मार्गाची रेकी केल्याचे समोर आले आहे. पोलीस वाहन अडवून आंदेकर आणि वाडेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तूलही उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने हा थरारक कट उधळून लावत संभाव्य मोठा रक्तपात टाळला.

पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट-दोनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, शस्त्रे कुठून आणण्यात आली आणि कटाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news