Pune Vegetable Market Rates: पुणे मार्केट यार्डात भेंडी, मिरची, मटार महागले; टोमॅटो, फ्लॉवर स्वस्त

आवक घटल्याने प्रमुख फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांची वाढ; उष्णतेमुळे पालेभाज्यांचे दरही वधारले, नवीन कांद्याला अधिक भाव
Vegetable
VegetablePudhari
Published on: 
Updated on: 

शंकर कवडे

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. १८) फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. मात्र, भेंडी, हिरवी मिरची, गाजर, शेवगा, ढोबळी मिरची, काकडी आणि मटारची आवक घटल्याने त्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडे टोमॅटो, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घसरण झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहिले. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

Vegetable
Pune Fruit Market Rates: पुण्यात लिंबाचे दर घसरले; डाळिंब, सफरचंद महागले

दरम्यान, बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, जुन्या कांद्याच्या तुलनेत नवीन कांद्याला अधिक दर मिळत आहे. परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, कर्नाटकातून कोबी ३, घेवडा २, गुजरातमधून भुईमूग शेंग २ ते ३, हिमाचल प्रदेशातून मटार १, इंदूर येथून गाजर ५, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा २ ते ३, बंगळुरूहून आले २ टेम्पो, तर तमिळनाडूतून तोतापुरी कैरीची १०० क्रेट आवक झाली.

Vegetable
Pune Market Rates: पुण्यात साखर, गूळ महागले; ज्वारी, बाजरीच्या दरातही तेजी

स्थानिक भागातून सातारी आल्याची सुमारे ४०० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेम्पो, काकडी ५, फ्लॉवर १०, कोबी ८, ढोबळी मिरची १०, गाजर ५, तांबडा भोपळा १० टेम्पो, मटार २०० गोणी, घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ टेम्पो, तर कांद्याची सुमारे ८० टेम्पो आवक झाली.

Vegetable
Pune Fish Market Rates: पुण्यात पापलेट, रावस महागले; मटण, चिकनचे दर स्थिर

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव:

कांदा : जुना ३८० ते ४३०, नवीन ४०० ते ४५०, बटाटा : १०० ते २००, लसूण : ७०० ते २१००, आले (सातारी) : जुने १७०० ते १७५०, नवीन ६०० ते ६५०, भेंडी : ३०० ते ५००, गवार : ४०० ते ६००, टोमॅटो : ८० ते १००, दोडका : ३०० ते ४००, हिरवी मिरची : ६०० ते ६५०, दुधी भोपळा : १०० ते २००, चवळी : १५० ते २००, काकडी : २५० ते ३५०, कारली : २०० ते ३००, पापडी : ४०० ते ४५०, पडवळ : १५० ते २००, फ्लॉवर : ८० ते १००, कोबी : ६० ते १००, वांगी : २०० ते ४००, ढोबळी मिरची : ४५० ते ५००, तोंडली : २०० ते ४५०, शेवगा : ६०० ते ७००, गाजर : ३०० ते ३५०, वालवर : ४०० ते ४५०, बीट : २०० ते २४०, घेवडा : ४०० ते ६००, कोहळा : १०० ते १५०, आर्वी : २५० ते ३००, घोसावळे : २०० ते २५०, ढेमसे : २५० ते ३००, भुईमूग शेंग : ६०० ते ६५०, मटार : १००० ते १३००, पावटा : ३५० ते ४००, तांबडा भोपळा : १०० ते १५०, तोतापुरी कैरी : १००० ते ११००, रताळी : २५० ते ३००, सुरण : १८० ते २२०, मका कणीस : ५० ते १००, नारळ (शेकडा) : १००० ते १६००.

Vegetable
Pune Railway Station Diwali Arrangements: दिवाळी, छठपूजेसाठी पुणे रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी स्वतंत्र मंडप

उष्णतेचा पालेभाज्यांना फटका; दरात वाढ!

वाढत्या तापमानाचा फटका पालेभाज्यांच्या उत्पादनाला बसत असून, बाजारातील आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजार, तर मेथीची २० हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीला शेकडा १५०० ते २००० रुपये, तर मेथीला २००० ते २५०० रुपये दर मिळाला.

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे : कोथिंबीर : १५०० ते २०००, मेथी : २००० ते २५००, शेपू : १५०० ते २०००, कांदापात : १५०० ते २०००, चाकवत : १००० ते १५००, करडई : १००० ते १२००, पुदिना : ५०० ते ६००, अंबाडी : ८०० ते १०००, मुळे : २००० ते २५००, राजगिरा : ८०० ते १०००, चुका : ८०० ते १०००, चवळई : १२०० ते १५००, पालक : १००० ते १२००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news