Pune Fruit Market Rates: पुण्यात लिंबाचे दर घसरले; डाळिंब, सफरचंद महागले

कच्च्या लिंबाची आवक वाढल्याने गोणीमागे १०० ते २०० रुपयांची घसरण; ऑक्टोबर हीटमुळे रसदार फळांना मागणी
Lemon
LemonPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: वातावरणातील उष्णता वाढल्याने बाजारात लिंबाला मागणी वाढली आहे. लिंबाला चांगले दर मिळत असल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांकडून कच्चा तसेच अपरिपक्व लिंबाची मोठ्या प्रमाणात तोडणी करून बाजारात पाठविण्यात येत आहे. परिणामी, लिंबाच्या १५ ते २० किलोच्या गोणीमागे शंभर ते दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे.

Lemon
Pune Market Rates: पुण्यात साखर, गूळ महागले; ज्वारी, बाजरीच्या दरातही तेजी

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळांना मागणी कायम आहे. त्यातच ऑक्टोबर हीटचा चटका वाढल्याने रसदार फळांनाही चांगला उठाव मिळत आहे. यामध्ये, डाळींब, सफरचंद आदींना मागणी वाढल्याने त्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Lemon
Pune Fish Market Rates: पुण्यात पापलेट, रावस महागले; मटण, चिकनचे दर स्थिर

तर, प्रतवारीत घसरण झाल्याने मागणीअभावी पेरू, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांचे दर गतआठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. रविवारी (दि. १८) लिंबाची एक हजार ते बाराशे गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई २० ते २५ टेम्पो, कलिंगड २५ ते ३० गाड्या, खरबूज १० ते १५ टेम्पो, चिक्कू दोन हजार डाग, पेरू ७०० ते ८०० क्रेटस्, सीताफळ ३ टन, ड्रॅगन फ्रूट ८०० ते ९०० क्रेटस्‌, सफरचंद सहा ते सात हजार पेट्या, बोरे २५ ते ३० टन आणि अननसाची ६ ट्रक आवक झाली.

Lemon
Pune Railway Station Diwali Arrangements: दिवाळी, छठपूजेसाठी पुणे रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी स्वतंत्र मंडप

फळांचे दर पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : २०० ते २०००, मोसंबी (३ डझन) : १३० ते ३२०, (४ डझन) : ४० ते १३०, संत्री (१० किलो) : १५० ते ७००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ८० ते २५०, आरक्ता : ३० ते ८०, गणेश : १० ते ४०, कलिंगड : ५ ते १८, खरबूज : १० ते ३०, पपई : १० ते ३०, चिक्कू (१० किलो) : १०० ते ६००, पेरू (२० किलो) : ४०० ते ६००, अननस (१ डझन) : ३०० ते ९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २० ते २००, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : ५० ते ७०, सफरचंद (१५ ते २५ किलो) : १४०० ते ४५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news