Pune Kidnapping Case: तीन वर्षांचं प्रेम आणि एक नकार, तरुणाच्या अपहरणामागे प्रेयसीचा हात

लग्नास नकार दिल्याने तरुणाचे अपहरण; बीडमध्ये चार तासांत पोलिसांकडून सुटका, प्रकरणाने खळबळ
Police Rescue
Police RescuePudhari
Published on
Updated on

पुणे: तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, घरचे ऐकत नाहीत म्हणून तरुणाने प्रेयसीला लग्नास नकार दिला. तो नकार प्रेयसीच्या जिव्हारी लागल्याने तिने आपल्या गावकडील पोरं बोलावून प्रियकराचे अपहरण केले. अपहरण झालेला प्रियकर तरुण नीलेश लक्ष्मण बोद्रे (वय 29, रा. शिंदेवाडी, ता. हवेली) याची लोणीकंद पोलिसांनी बीड, नांदेड आणि परभणी पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार तासांत माजलगाव येथून सुखरूप सुटका केली, तर अपहरण करणाऱ्या प्रेयसी तरुणीसह तिच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच एका विधीसंघर्षीत मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.

Police Rescue
Pune Night Food Vendors Issue: पुण्यात नाईट फूड व्हेंडिंग झोनची मागणी; हातगाडी व्यावसायिकांवर कारवाईचा निषेध

सोनाली बालाजी निर्वाळ (वय 27), सुदाम मानिक ताठे (वय 23), शेख सोहेल शेख अफसर (वय 21), देवीदास भगवान पांजगे (वय 21), वैभम मिलिंद शेळके (वय 22), सारंग भगवानराव काकडे (वय 33), प्रसाद बंडू गवळी (वय 27, रा. सर्व परभणी जिल्ह्यातील) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Police Rescue
Pune PMC Property Tax Collection: पुणे महापालिकेची विक्रमी कामगिरी; 58 दिवसांत 1 हजार कोटींचे कर संकलन

बुधवारी (दि. 27) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षास अजय बोद्रे यांनी माहिती दिली की, त्यांच्या भावाचे एका मोटारीतून काही लोकांनी येथील एच.पी. पेट्रोल पंप शिवनेरी मिसळ समोरून अपहरण केले आहे.

Police Rescue
Pune Yerwada Jail Clash: पुण्यातील येरवडा कारागृहात तंबाखूवरून कैद्यांमध्ये हाणामारी

लोणीकंद पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार या घटनेवर लक्ष ठेवून होते. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत होती. तांत्रिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी अपहृत व्यक्तीला बीड जिल्ह्याकडे घेऊन निघाले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांनी बीड, नांदेड आणि परभणी पोलिसांच्या मदतीने नीलेश बोद्रे याची सुटका केली. बोद्रेकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले, सोनाली निर्वाळसोबत त्याचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोनालीला त्याच्यासोबत लग्न करायचे होते.

Police Rescue
Pune Street Food Closed: पुण्यात रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या बंद; विद्यार्थ्यांकडून नाराजी

परंतु घरचे ऐकत नाहीत म्हणून बोद्रेने तिला लग्नासाठी नकार दिला होता. त्याच कारणातून सोनालीने आपल्या गावाकडील पोरं बोलावून नीलेश बोद्रेला मारहाण करून त्याचे अपहरण केले. यावेळी सोनाली स्वतः इतर आरोपींसोबत मोटारीत होती. सोनाली बोद्रेला गावी घेऊन जाऊन त्याच्यासोबत कोर्टात लग्न करणार होती. याबाबबत लोणीकंद पोलिसांनी प्रेयसी सोनालीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सह पोलिस आयुक्त संजय दराडे, पोलिस उपायुक्त गोहर हसन, प्रशांत अमृतकर, राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे, स्वाती खेडकर, सपोनि विजया वंजारी, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तुकाराम सुरवसे, कर्मचारी कैलास साळुंके, सागर जगताप, रीतेश काळे, तुषार पवार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news