Pune Yerwada Jail Clash: पुण्यातील येरवडा कारागृहात तंबाखूवरून कैद्यांमध्ये हाणामारी

तंबाखू मागण्यावरून वाद; दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल, एक जखमी
Yerwada Jail
Yerwada Jail Pudhari
Published on
Updated on

पुणे: येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून कैद्यांमध्ये वाद झाला. या वेळी दोन कैद्यांनी एका कैद्याला मारहाण केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अजय शंकर राठोड, संतोष सुरेश भालेराव या दोन कैद्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Yerwada Jail
Pune Street Food Closed: पुण्यात रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या बंद; विद्यार्थ्यांकडून नाराजी

याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी फिर्याद दिली आहे. तर शुभम पंढरीनाथ पोखरकर असे जखमी कैद्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी आठ वाजेच्या सुमारास सर्कल क्रमांक दोन, बॅरेक क्रमांक सहामधील बाहेरील बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाशेजारील पाण्याच्या हौदाजवळ घडली आहे.

Yerwada Jail
Pune Pimpri Milindnagar SRA Scam: पिंपरीच्या मिलिंदनगर एसआरए योजनेत 328 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोन परिसरातील बराकीच्या परिसरात स्वच्छतागृह आहे. बुधवारी (दि. 27 मे) सकाळी सातच्या सुमारास शौचालयाच्या परिसरातील हौदाजवळ कैदी शुभम पोखरकर थांबला होता. तो स्वच्छतागृहात जात असताना राठोड आणि भालेराव यांनी पोखरकर याला अडवून तंबाखू मागितली.

Yerwada Jail
Monsoon Arrival 48 Hours | मान्सून येत्या 48 तासांत केरळम्मध्ये येण्याची शक्यता

तंबाखूवरून दोघांनी वाद घालून जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली पोखरकर याच्या डोक्यात मारली. पोखरकर जखमी झाला. कैद्यांमधील हाणामारीचा प्रकार पाहून कारागृहातील रक्षकांनी तेथे धाव घेतली. राठोड आणि भालेराव यांना ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

Yerwada Jail
Maharashtra Cooperative Bank Cyber Security Center: राज्य सहकारी बँकेकडून 50 कोटींचे सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू

पोलिस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत. येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीच्या घटना, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news