Pune PMC Property Tax Collection: पुणे महापालिकेची विक्रमी कामगिरी; 58 दिवसांत 1 हजार कोटींचे कर संकलन

मिळकत कर विभागाने इतिहासात प्रथमच कमी कालावधीत गाठला हजार कोटींचा टप्पा; 31 मेपर्यंत कर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात केवळ 58 दिवसांत 1 हजार कोटी रुपयांचे कर संकलन पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी कालावधीत 1 हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा पार झाला आहे.

Property Tax
Pune Yerwada Jail Clash: पुण्यातील येरवडा कारागृहात तंबाखूवरून कैद्यांमध्ये हाणामारी

महापालिकेच्या चालू वर्षाच्या (2025-26 ) अंदाजपत्रकात मिळकत करातून 3 हजार 352 कोटींच्या उत्पनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार दि. 1 एप्रिलपासून प्रशासनाकडून मिळकत कराच्या बिलांचे वाटप करून कर वसुलीस सुरुवात करण्यात आली आहे.

Property Tax
Pune Street Food Closed: पुण्यात रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या बंद; विद्यार्थ्यांकडून नाराजी

त्यात दि. 28 मेपर्यंत तब्बल 1 हजार कोटींचा कर वसूल झाला असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी दिली. यामध्ये 4 लाख 67 हजार 644 रहिवासी मिळकतकर धारकांनी 508 कोटी 64 लाखांचा मिळकत कर जमा केला आहे.

Property Tax
Pune Pimpri Milindnagar SRA Scam: पिंपरीच्या मिलिंदनगर एसआरए योजनेत 328 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप

तर, 64 हजार 919 व्यापारी मिळकतकर धारकांनी 397 कोटी 92 लाख मिळकत कर भरला आहे. याशिवाय, 5 हजार 278 ओपन प्लॉटधारकांनी 30 कोटी 65 लाखांचा, तर अन्य 7 हजार 941 मिळकतकर धारकांनी 64 कोटी 72 लाखांचा कर जमा केला आहे.

Property Tax
Maharashtra Cooperative Bank Cyber Security Center: राज्य सहकारी बँकेकडून 50 कोटींचे सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू

गत वर्षी याच कालावधीत 453 कोटींचा कर जमा झाला होता. या वर्षी जवळपास दुपटीपेक्षा अधिक कर जमा झाला असून, 58 दिवसांत पहिल्यांदाच 1 हजार कोटींचा कर जमा झाला आहे. दरम्यान, महापालिकेकडून वेळेत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना 5 ते 10 टक्क्यांची सवलत सर्वसाधारण करात दिली जाते. ही सवलत दि. 31 मेपर्यंत मिळणार असून, पुणेकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळकत कर विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news