Pune Road Accident Compensation: लोकअदालतीत अपघातग्रस्त कुटुंबाला 1.08 कोटींची भरपाई

भीषण अपघातात कर्ता गमावलेल्या कुटुंबाला दिलासा; गृहिणीलाही 11 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

पुणे: भीषण रस्ते अपघातात कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला अखेर लोकअदालतीत न्याय मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात तडजोड होऊन संबंधित कुटुंबाला तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Money
Pune Gay Dating App Robbery: गे डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढून लूट; पुण्यात टोळी अटकेत

दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेऐवजी लोकअदालतीत सामंजस्याने झालेल्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनलसमोर हा दावा निकाली काढण्यात आला.

Money
Maharashtra Vertical Property Card: फ्लॅटधारकांसाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ योजना गतीत

एप्रिल 2024 मध्ये शहरातील मध्यवर्ती भागातून दुचाकीवरून जात असताना राघव (नाव बदलले) यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक आणि मानसिक आघात झाला होता. राघव यांना दरमहा सुमारे 70 हजार रुपयांचे उत्पन्न होते. ते कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य असल्याने त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

Money
Private School Teachers TET Verification: खासगी शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेचीही होणार तपासणी

त्यानंतर कुटुंबीयांनी डंपर मालक आणि संबंधित विमा कंपनी असलेल्या चोलामंडलम एमएस इन्शुरन्स कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. दाव्याच्या सुनावणीदरम्यान मृत व्यक्तीचे उत्पन्न, कुटुंबीयांचे त्यांच्यावर असलेले आर्थिक अवलंबित्व, भविष्यातील आर्थिक नुकसान आणि इतर बाबींचा विचार करण्यात आला. त्यानंतर लोकअदालतीत दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईवर तडजोड झाली. या निर्णयामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून कुटुंबीयांची सुटका झाली असून, त्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Money
Pune Mangalore Direct Flight: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे-मंगलोर थेट विमानसेवा 1 जूनपासून सुरू होण्याची शक्यता

अपघातग््रास्त गृहिणीला मिळणार 11 लाख रुपये

अपघातात गंभीर जखमी होऊन 10 टक्के अपंगत्व आलेल्या गृहिणी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर लोकअदालतमध्ये न्याय मिळाला. संबंधित महिलेला 11 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यावर शनिवारी तडजोड झाली. वैभवी (वय 53) (नाव बदलले आहे) या 14 मार्च 2024 रोजी एसटी बसने पुण्याहून मुंबईकडे जात असताना पुनावळे गावाच्या हद्दीत समोरून आलेल्या आयसर टेम्पोने एसटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या पायाला अपंगत्व आले. खासगी रुग्णालयातील उपचारांसाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च झाला होता. नुकसानभरपाईसाठी त्यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. आयसरचे मालक आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीविरोधातील हा दावा लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आला होता. त्यामध्ये 11 लाख रुपयांच्या भरपाईवर समझोता झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news