Pune Gay Dating App Robbery: गे डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढून लूट; पुण्यात टोळी अटकेत

भेटीस बोलावून निर्जनस्थळी मारहाण; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
Dating App Robbery
Dating App RobberyPudhari
Published on
Updated on

पुणे: गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाशी मैत्री केल्यानंतर त्याला भेटायला बोलावून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी तिघांना अटक करीत एका अल्पवयीनाला ताब्यात घेतलेे.

Dating App Robbery
Maharashtra Vertical Property Card: फ्लॅटधारकांसाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ योजना गतीत

ओम गणेश वाघमारे (वय 20, रा. वारजे माळवाडी), गणेश उत्तम माने (वय 27, रा. आकाशनगर, वारजे) आणि जगदीश रामू पवार (वय 23, रा. शिवणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत कर्वेनगर येथील 25 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Dating App Robbery
Private School Teachers TET Verification: खासगी शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेचीही होणार तपासणी

कर्वेनगरातील 25 वर्षीय युवकाची आरोपींशी गे डेटिंग ॲपवरून ओळख झाली होती. संवाद वाढल्यानंतर 28 एप्रिलच्या रात्री एका अल्पवयीन आरोपीने युवकाला कर्वेनगर येथील डी-मार्टजवळ भेटण्यासाठी बोलावले. तेथून दुचाकीवरून त्याला निर्जनस्थळी नेले. काही वेळांतच त्याचे तीन साथीदार तेथे आले.

Dating App Robbery
Pune Mangalore Direct Flight: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे-मंगलोर थेट विमानसेवा 1 जूनपासून सुरू होण्याची शक्यता

युवक चुकीच्या हेतूने येथे आल्याचा खोटा आरोप करत आरोपींनी त्याच्यावर दगडाने हल्ला केला. नंतर आरोपींनी युवकाचा मोबाईल हिसकावून घेत 8 हजार 600 रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. तसेच गळ्यातील चांदीची चेन जबरदस्तीने काढून घेतली.

Dating App Robbery
Pune Mangalore Direct Flight: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे-मंगलोर थेट विमानसेवा 1 जूनपासून सुरू होण्याची शक्यता

घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी अतुलनगर चौक परिसरातून मुख्य आरोपी ओम वाघमारे याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news