Pune Mangalore Direct Flight: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे-मंगलोर थेट विमानसेवा 1 जूनपासून सुरू होण्याची शक्यता

दक्षिण भारत प्रवास होणार अधिक सोयीस्कर; पुणे विमानतळ प्रशासनाचे नियोजन अंतिम टप्प्यात
Flight
FlightPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्याहून कर्नाटकच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर असलेल्या मंगलोर (मंगळुरू) साठी लवकरच थेट विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन पुणे विमानतळ प्रशासनाकडून सुरू आहे. 1 जून रोजी ही नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असून, या विमानसेवेमुळे पुणेकरांसाठी आणि विशेषतः दक्षिण भारतात वारंवार प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Flight
Pune Crime: मामाच्या मुलीवर लाइन मारल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना 10 वर्षांची शिक्षा

उन्हाळी सुट्‌‍ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील स्लॉटमध्ये (विमानांच्या येण्या-जाण्याच्या वेळा) वाढ करण्यात आली आहे. यामुळे नवीन मार्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने 1 जूनपासून मंगलोर शहरासाठी ही सेवा प्रत्यक्ष सुरू करण्याच्या हालचाली विमानतळ प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

Flight
MTDC Summer Tourism Booking Rush: एमटीडीसी रिसॉर्ट्स फुल्ल हाऊस; उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी

सध्या पुणे ते मंगलोर प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वे किंवा खासगी बसवर अवलंबून राहावे लागते, त्यासाठी 10 ते 15 तासांचा वेळ लागतो. थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे व्यापारी, पर्यटक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Flight
Rahu Illegal Mining Forest Issue: राहू वनक्षेत्रात अवैध उत्खननाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मंगलोर हे फक्त एक शहर नसून, कर्नाटकच्या किनारपट्टीवरील एक प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. मंगलोर हे कर्नाटकचे एकमेव असे शहर आहे, जिथे हवाई, रस्ते, रेल्वे आणि सागरी (बंदर) अशा चारही प्रकारच्या वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. येथे प्रामुख्याने तुलू, कन्नड, कोकणी आणि बेअरी भाषा बोलल्या जातात.

Flight
Nira Baramati Road Widening Issue: निरा-बारामती रस्त्याचे काम धुळीच्या विळख्यात; सुरक्षेचा बोजवारा उडाला

अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे शहर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, उन्हाळी वेळापत्रकात नवीन विमान सेवांना परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगलोरसाठी नवीन सेवा सुरू करण्याचे आमच्याकडून नियोजन सुरू आहे, असे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news