Pune Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमधील तरुणाची आत्महत्या; धमकावून पैशांची मागणी करणारे चौघे अटकेत

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत मानसिक छळ; खराडीतील घटना
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पुणे: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पैशांची मागणी करून मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे.

Assault
Pimpri SRA Scam: झोपडपट्टीच नसताना एसआरए योजना मंजूर? पिंपरीतील सरकारी जागेवरील कथित घोटाळा उघड

करण बाळासाहेब कांबळे (वय 28, मूळ रा. खरबा, ता. मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही उर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय 31, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोढर्डे (वय 41, रा. जेधेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय 25) आणि ऋतिक सुधीर रणदिवे (वय 26, दोघे रा. बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. करणचा भाऊ कृष्णा कांबळे (वय 34) याने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Assault
Pune Feeder Pillar Relocation: पुण्यात फीडर पिलर हटवण्यावरून महापालिका-महावितरण आमनेसामने

प्रीती आणि करण यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. प्रीतीचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे ती वेगळी राहत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाल्यानंतर प्रीती आणि करण हे खराडीतील थिटे वस्ती परिसरात एकत्र राहत होते.

Assault
Pune PMAY Flats Illegal Rental: पुण्यात PMAY सदनिकांचा गैरवापर; 100–150 फ्लॅट्स बेकायदेशीर भाड्याने

दरम्यान, प्रीतीचा पहिला पती अनिकेत बोढर्डे तसेच तिची बहीण संस्कृती आणि भाऊ ऋतिक यांनी करणला सतत त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते.

Assault
Pune Monsoon Drain Cleaning: पुण्यात नालेसफाईची मुदत 15 जूनपर्यंत वाढली; पावसाळी तयारी रखडली

पैसे न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होते. अखेर या त्रासाला कंटाळून करणने खराडीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादित नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news