Baramati Illegal Liquor Action: बारामतीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा दणका; एकाच दिवशी ३.२५ लाखांची दारू जप्त, पाच जणांवर गुन्हे

शिर्सुफळमध्ये चार ठिकाणी कारवाई; देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत, बेकायदा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुका पोलिसांनी शिर्सुफळ (ता. बारामती) गावामध्ये शनिवारी (दि. २४) एकाच दिवशी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वातीन लाखांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. चार ठिकाणच्या कारवाईत एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Liquor
Rahu Theft Case: राहूत चोरट्यांचा धुमाकूळ; घरांना बाहेरून कड्या लावून दहशत, मोटारसायकल चोरीने नागरिक भयभीत

पोलिस अंमलदार नितीन ढवाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन विठ्ठल म्हेत्रे (रा. शिर्सुफळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हेत्रे यांच्याकडे देशी-विदेशी दारूच्या २ हजार ५२० रुपयांच्या २६ बाटल्या मिळून आल्या. ओळखीच्या लोकांना या दारूची चोरून विक्री केली जात होती.

Liquor
Pune Robbery Case: एक कोटीच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकार अटकेत; दोन पोलिस कर्मचारी सहआरोपी, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

दुसऱ्या कारवाईत नाना वसंत आटोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार सागर देशमाने यांनी फिर्याद दिली. या कारवाईत देशी व विदेशी दारूच्या ५३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ४ हजार २९० रुपये इतकी आहे. राहत्या घराच्या आडोशाला आटोळे यांच्याकडून बेकायदेशीरपणे ही दारू विकली जात होती.

Liquor
Vitthalwadi Ashadhi Ekadashi: ‘प्रतिपंढरपूर’ विठ्ठलवाडीत भक्तीचा महापूर; आषाढी एकादशीला हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

तिसऱ्या कारवाईत वेद मधुकर गायकवाड (रा. पाटस, ता. दौंड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार अभिजित एकशिंगे यांनी फिर्याद दिली आहे. शिर्सुफळमधील तेजश्री बिअर शाॅपीसमोरील रस्त्यालगतच्या एका शटरच्या गाळ्यात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या सुमारे ७०७ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यातील काही बाटल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पवार यांनी पंचांसमक्ष जप्त करून उर्वरित माल जागीच सील करण्यात आला.

Liquor
Pune Firing Case: पुण्यात खडक परिसरात गोळीबाराचे थरारक सत्र; दोन घटनांमध्ये सात जण अटकेत, बप्पा कसबे ताब्यात

चौथ्या कारवाईत सुखदेव हिवरकर (रा. शिर्सुफळ) व दिनेश दत्तू हजारे (रा. झारगडवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार मनोज पवार यांनी याबाबत फिर्याद दिली. या कारवाईत २ लाख ४५ हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या १ हजार ९३ दारू बाटल्या जप्त केल्या गेल्या. अंकिता बिअर शाॅपनजीक असलेल्या एका गाळ्यात दारूचा हा बेकायदा साठा पोलिसांना आढळून आला. बिअरशाॅपीचे मालक हिवरकर व कामगार हजारे या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news