Pune Hotel Gas Cylinder: गॅस सिलिंडर तुटवड्याचा फटका; जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल्सनी कोळसा-इंडक्शनचा घेतला आधार

आखातातील युद्धाचा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायावर; काही कॅफे बंद, तर काही ठिकाणी मर्यादित मेनू
Pune Hotel Gas Cylinder
Pune Hotel Gas CylinderPudhari
Published on
Updated on

पुणे : आखातात भडकलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील अनेक हॉटेलांनी स्वयंपाकासाठी कोळसा आणि इंडक्शनचा पर्याय स्वीकारला आहे. दररोज चार सिलिंडर वापरणाऱ्या काही हॉटेलांना आता कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pune Hotel Gas Cylinder
Gas Supply Crisis: गॅस पुरवठा ठप्प; पुण्यातील हॉटेल्ससमोर मोठे संकट

पांचाली हॉटेलचे व्यवस्थापक शांताराम पुजारी यांनी सांगितले की, सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सध्या कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक तयार केला जात आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले आहे. सध्या कोणताही पदार्थ मेनूमधून कमी केलेला नाही, तसेच खाद्यपदार्थांच्या दरातही कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच, ग््रााहकांची वर्दळही कायम आहे.

दरम्यान, बाम्बू हाऊस आणि मॉडर्न कॅफेचे व्यवस्थापक देवानंद गिरी यांनी सांगितले की, रविवारपासून कॅफे बंद ठेवावे लागले आहे. हाऊसमध्ये मर्यादित खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत.

Pune Hotel Gas Cylinder
High blood pressure | राज्यात 10 लाख नागरिकांना उच्च रक्तदाब

सध्या कोळसा आणि इंडक्शनच्या साहाय्याने स्वयंपाक सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज दोन सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, सध्या पुरवठा होत नसल्याने शुक्रवारपासून कोळशाचा वापर करून कॅफे पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे. सिलिंडरच्या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असून, काही ठिकाणी खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. मात्र, ग््रााहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी सध्या तरी कोणत्याही पदार्थांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.

Pune Hotel Gas Cylinder
Sunetra Pawar : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

गॅस सिलिंडरअभावी काही व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे, तर काहींनी कोळशाच्या भट्टीचा आधार घेतला आहे मित्रमंडळ चौकाजवळील हे दृश्य. (छाया : अनंत टोले)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news