Pune IMD Digital Observatory: पुण्यात 151 वर्षांची वेधशाळा डिजिटल; थर्मामीटरला रामराम

जागतिक हवामान दिनी मोठा निर्णय; देशभर 500 डिजिटल वेधशाळा उभारण्याचा आराखडा
IMD Digital Observatory
IMD Digital ObservatoryPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय हवामान विभागातून तापमापी अर्थात थर्मामीटर हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याची सुरुवात पुण्यातून झाली. कृषी महाविद्यालयातील 151 वर्षे जुनी वेधशाळा आता डिजिटल झाली आहे. हा देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. याच धर्तीवर देशभरातील 500 वेधशाळा तयार केल्या जाणार आहेत.

IMD Digital Observatory
Pune Stray Dogs Microchip: पुण्यात भटक्या श्वानांसाठी मायक्रोचिप प्रकल्प; नसबंदी-लसीकरण नोंदी डिजिटल

इंग््राजांनी भारतात 15 जानेवारी 1875 मध्ये भारतीय हवामान विभागाची स्थापना केली होती. पारा वापरून तयार केलेल्या या तापमापीशिवाय हवामान विभागाचे कामच होत नव्हते. पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील इमारत इंग््राजांनी बांधली आहे. येथे त्या काळीतल भलेमोठे थर्मामीटर आजही भिंतीवर लावलेले दिसते.

IMD Digital Observatory
Hadapsar Canal Burst: हडपसरमध्ये मुठा कालवा फुटला; मगरपट्टा सिटी परिसरात पूरस्थिती

23 मार्च 2026 या जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून वेधशाळांतून थर्मामीटर हद्दपार करण्याचा संकल्प भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी या डिजिटल वेधशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केला. भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील पृष्ठभागीय उपकरण विभागाअंतर्गत डिझाइन आणि विकसित केलेली ही प्रणाली हवामानशास्त्रीय प्रयोगांसाठी जिओ-टॅग केलेल्या डेटासह हवेचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, दाब, वाऱ्याची माहिती आणि पर्जन्यमान मोजण्यासाठी वाय-फाय सक्षम इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सेन्सर्सवर आधारित आहे.

IMD Digital Observatory
LPG Gas Shortage: चाकणमध्ये गॅसटंचाईचा तीव्र फटका; उद्योग व हॉटेल व्यवसाय अडचणीत

पाऱ्याचे दुष्परिणाम ओळखून निर्णय

आयएमडी पुणेचे अतिरिक्त महासंचालक के. सी. साईकृष्णन यांनी सांगितले की, मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचे पाऱ्याच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने संपूर्ण जगाने पाऱ्याचा वापर बंद केला आहे. भारत सरकार देखील या करारावर स्वाक्षरी करणारा देश आहे. त्यामुळे आता पारा आधारित उपकरणे बंद करून त्या जागी डिजिटल सेन्सरचा वापर केला जाणार आहे.

IMD Digital Observatory
Property Tax Recovery: शिरूर नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर धडक कारवाई; मालमत्ता सील मोहीम तीव्र

तापमापी, आर्द्रता सेन्सर, बॅरोमीटर झाले डिजिटल

सरकारच्या ‌‘मेक इन इंडिया‌’, ‌‘आत्मनिर्भर भारत‌’ आणि ‌‘डिजिटल इंडिया‌’ या संकल्पनांनुसार, भारतीय हवामान विभागाच्या स्मार्ट सरफेस वेदर या विभागातील डॉ. सीजा झकेरीया यांनी पथदर्शी प्रकल्पातील ही डिजिटल यंत्रे तयार केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news