Hadapsar Canal Burst: हडपसरमध्ये मुठा कालवा फुटला; मगरपट्टा सिटी परिसरात पूरस्थिती

शिंदेवस्तीतील भगदाडामुळे पाणी शहरात शिरले; वाहतूक पाच तास ठप्प, उन्हाळी आवर्तनावर परिणामाची भीती
Hadapsar Canal Burst
Hadapsar Canal BurstPudhari
Published on
Updated on

हडपसर: हडपसर परिसरातील शिंदेवस्ती येथे सोमवारी (दि. 23) पहाटे मुठा कालवा फुटल्याने मगरपट्टा सिटी आणि नगर रोड बायपास परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. परिसरात गुडघ्याइतके पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या दुर्घटनेमुळे तब्बल 18 ते 20 एमएलडी पाणी वाहून गेले. पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त असल्याने या भागात तब्बल पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. तसेच पर्यायी रस्त्यांवरील वाहतुकीचाही बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले. अखेर दुपारी एकच्या सुमारास या भागातील वाहतूक संथगतीने सुरू झाली.

Hadapsar Canal Burst
LPG Gas Shortage: चाकणमध्ये गॅसटंचाईचा तीव्र फटका; उद्योग व हॉटेल व्यवसाय अडचणीत

उन्हाळी आवर्तन सुरू असताना शिंदेवस्ती परिसरात मोठे भगदाड पडल्याने पहाटे तीनच्या सुमारास कालवा फुटला. यामुळे मगरपट्टा सिटी परिसरात पाणीच पाणी झाले. तसेच विबगोर स्कूल, कीर्तने बाग, मुंढवा रोड आणि ताडीगुत्ता चौकपर्यंत पाणी वाहत गेले. काही ठिकाणी कंबरे एवढे पाणी साचल्याचेही चित्र दिसून आले. परिसरात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत हे पाणी वाहत गेले.हडपसर औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये पाणी शिरले. याबाबत महिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहाचून खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणार पाणी बंद केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी या ठिकाणी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Hadapsar Canal Burst
Property Tax Recovery: शिरूर नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर धडक कारवाई; मालमत्ता सील मोहीम तीव्र

मगरपट्टा सिटी आणि नगर रोड बायपास परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी रस्त्यावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. हडपसर परिसरातील भोसले गार्डन, अमोल पाटील नक्षत्र गार्डन कॉर्नर, माळवाडी आदी भागातील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली. यामुळे मुंढवा चौकातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मगरपट्टा सिटीमगील कोरेगाव पार्ककडे जाणारा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मगरपट्टा-खराडी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मगरपट्टा सिटीत अचानक पाणी आल्यामुळे रहिवासी आणि परिसरातील नागरिक हवालदिल झाले.

Hadapsar Canal Burst
Pune Drug Bust: लोणी काळभोरमध्ये पानटपरीतून अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; दुकानदार अटकेत

‌‘चार दिवसांत होणार कालव्याची दुरुस्ती‌’

कालव्यात दगड-माती टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. कालव्यातील पाणी पूर्णपणे वाहून गेल्यानंतर उद्यापासून त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल. तीन ते चार दिवसांत ही दुरुस्ती पूर्ण होईल, असे खडकवासला साखळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी स्पष्ट केले

पाणी ओसरत नाही तोपर्यंत पर्यायी मार्ग

  • वैदुवाडी चौक-शिंदेवस्ती-शिर्के रोड-जहांगीरनगर चौक-ताडीगुत्ता मार्गे-मुंढवा चौक

  • 93 ॲव्हेन्यू मॉल/काळूबाई चौक-बी.टी. कवडे रोड - घोरपडी - फ्लायओव्हर-पिंगळेवस्ती-ताडीगुत्ता चौक-मुंढवा चौक

  • खराडीकडून येणाऱ्यांसाठी : मुंढवा चौक-ताडीगुत्ता चौक-पिंगळेवस्ती-घोरपडी रेल्वे फ्लायओव्हर-बी.टी. कवडे रोड-(डावीकडे वळून) हडपसर

  • मुंढवा चौक-ताडीगुत्ता चौक-जहांगीरनगर-बी.जी. शिर्के रोड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - (डावीकडे) शिंदेवस्ती-हडपसर इंडस्ट्रियल एरिया - वैदुवाडी चौक - सोलापूर हायवे

  • सोलापूर रोडकडून येणाऱ्यांसाठी: 15 नंबर-मांजरी- झेड कॉर्नर-लोणकरवस्ती-केशवनगर-मुंढवा चौक

उन्हाळी आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता

134 किलोमीटर लांबीचा हा कालवा थेट इंदापूरपर्यंत जातो. कालव्याच्या आसपास झालेल्या अतिक्रमणामुळे व त्यांच्याकडून कालव्यात टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे कालव्याची क्षमता कमी झाली आहे. या कालव्यातून पिकांचे सिंचनासाठी तसेच पुण्यासह दौंड, इंदापूर, बारामती, हवेली आणि आसपासच्या भागांना पिण्यासाठी देखील पाणी सोडण्यात येते. या दुर्घटनेमुळे शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या उन्हाळी आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Hadapsar Canal Burst
Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्प 25 टक्के पूर्ण; वाहतूक कोंडीला दिलासा

शिंदेवस्ती परिसरात कालवा फुटल्याने मगरपट्टा सिटी आणि नगर रोड बायपास परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काही तासांचा कालावधी लागणार आहे. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर

मगरपट्टा सिटीत अचानक पाणी आल्याचे आम्हाला लवकर समजले नाही. मात्र, माहिती घेतल्यानंतर कालवा फुटल्यामुळे परिसरात परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले. त्यांनतर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर प्रशासनाकडून मदत कार्य सुरू झाले.

हेमलता नीलेश मगर, नगरसेविका

शिंदेवस्ती येथील कालव्याच्या खालून महापालिकेची जलवाहिनी गेली आहे. कालव्याचा भरावही जुना झाला आहे. सोमवारी पहाटे कालवा फुटल्यामुळे मगरपट्टा सिटी परिसरात पाणी शिरले. याबाबत माहिती मिळताच सकाळी सात वाजता कालव्यात खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

रोहन ढमाळे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग

मगरपट्टा सिटीजवळील शिंदेवस्तीत कालवा फुटल्याची माहिती मिळतात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठिकाणी कालवा फुटला होता त्या ठिकाणी डंपरच्या साह्याने भराव टाकून बाहेर पडणारे पाणी रोखण्यात आले आहे.

कुणाल धुमाळ, सहायक आयुक्त, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news