Pune Illegal Pistols Seized: गणेशोत्सवात शस्त्रबंदीला हरताळ; पुण्यात सहा गुन्ह्यांत सात पिस्तुले जप्त

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; १८ वर्षीय तरुणासह अनेक आरोपी जाळ्यात, तस्करीच्या साखळीचाही तपास
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि परिसरात शस्त्रबंदीचे आदेश लागू असतानाही बेकायदा पिस्तुले तस्‍करीचे पेव वाढल्‍याचे व पिस्‍तूल घेऊन फिरणार्‍यांचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये सहा गुन्ह्यांत सात देशी बनावटीची पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवायांमध्ये पिस्तूल बाळगणार्‍या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Gun
Pune Police Constable Suspended: पत्नीला मारहाण, वाद सोडवणाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पोलिस अंमलदार निलंबित

पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील दोन गुन्ह्यांत फरारी असलेल्या सराईताला एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. सुशील तानाजी गायकवाड (वय ३९, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Gun
Maharashtra Stolen Mobile Recovery: महाराष्ट्रातील ७ लाखांहून अधिक मोबाईल चोरीला; ‘संचार साथी’मुळे १.६८ लाख हँडसेट मालकांना परत

पर्वतीत कसबेकडून पिस्तूल जप्‍त

पर्वती पोलिसांनी जनता वसाहत-कॅनॉल रोड परिसरात कारवाई करून अनिकेत बाबू कसबे (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शस्त्रबंदी आदेश लागू असताना बेकायदा पिस्तूल जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्‍याने हे पिस्‍तूल दहशत माजविण्यासाठी बाळगलयसाचे समोर आले आहे. पोलिस अमंलदार अमोल दबडे, अमित चिव्‍हे, रणिजित घाटगे याना आरोपीबाबत खबर मिळाली होती. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्‍हे निरीक्षक अति हिवरकर, सहायक पोलिस निरीक्षक विशाल राऊत, उपनिरीक्षक प्रकाश खिलारी, अंमदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे यांच्‍या पथकाने केली.

Gun
Pune Noise Pollution Petition: पुण्यात ध्वनिप्रदूषणावरून पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका; उत्सवांसह बार-पबही रडारवर

भारती विद्यापीठात अठरा वर्षीय तरुण जाळ्यात

भारती विद्यापीठ पोलिसांनी साईसिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ परिसरात कारवाई करून अंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८) याला पकडले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अठरा वर्षांच्या तरुणाकडे पिस्तूल सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.

कात्रजमध्ये दोघांकडून दोन पिस्तुले

भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज डेअरी चौक ते सरहद्द चौक परिसरात केलेल्या कारवाईत सागर चंद्रकांत बोरगे (वय ३६) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Gun
Maharashtra Jobs For Ex Agniveers: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १,००० अधिसंख्य पदांना मंजुरी

आणखी एका कारवाईत दोघांवर गुन्हा

लोणीकंद परिसरातील पिंपरी सांडसमधील आणखी एका कारवाईत अशोक वामन भोरडे (वय २७) आणि प्रणव संदीप भोरडे (वय १९) यांच्याविरुद्धही बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची नोंद आहे.

शस्त्रबंदी असतानाही धाडस

गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शस्त्र बाळगणार्‍यांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरात आणि उपनगरांमध्ये बेकायदा पिस्तुले बाळगून फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, याचाही तपास केला जात आहे. विविध भागांतून एकाच कालावधीत पिस्तुले सापडल्याने पोलिसांनी शस्त्रांची तस्करी आणि पुरवठ्याच्या साखळीचाही तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news