Maharashtra Stolen Mobile Recovery: महाराष्ट्रातील ७ लाखांहून अधिक मोबाईल चोरीला; ‘संचार साथी’मुळे १.६८ लाख हँडसेट मालकांना परत

डीओटीची मोठी कामगिरी; हरवलेल्या आणि चोरीच्या मोबाईलचा शोध घेण्यात महाराष्ट्राची कामगिरी देशाच्या सरासरीपेक्षा सरस
Mobile
MobilePudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्रातून तब्बल ७ लाख ११ हजार ५६२ नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी सुमारे ४ लाख १३ हजार ९१ हँडसेटचा शोध लागला. त्यापैकी १ लाख ६८ हजार ७०१ मोबाईल प्रत्यक्षात नागरिकांना परत देण्यात आले आहेत. डिपार्टमेट ऑफ टेलिकॉम ची (डीओटी) ही कामगिरी आहे.

Mobile
Pune Noise Pollution Petition: पुण्यात ध्वनिप्रदूषणावरून पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका; उत्सवांसह बार-पबही रडारवर

भारतासारखा महाकाय खंडप्राय देश १४० कोटी लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे ११५ कोटी लोकांकडे मोबाईल आहे. त्यातील सुमारे ६६ कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. देशात दररोज पंधराशे ते दोन हजार तर महिन्याला तब्बल ५० हजार मोबाईल हरवतात किंवा चोरीला जातात. त्यासाठी १६ मे २०२३ रोजी संचार साथी संकेतस्थळ सरकारने निर्माण केले.

Mobile
Maharashtra Jobs For Ex Agniveers: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १,००० अधिसंख्य पदांना मंजुरी

तर १७ जानेवारी २०२५ रोजी संचार साथी नावाने ॲप सुरू केले. मोबाईल हरवला की यावर तक्रार नोंदवली की, सरकारी पातळीवर याची दाखल घेऊन तो शोधून दिला जातो. अवघ्या दीड वर्षात या ॲपने कमाल केली असून, देशातील लाखो नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून दिले आहेत.

Mobile
CHB Teachers Honorarium: शासकीय निवासी शाळांतील सीएचबी शिक्षकांचे मानधन वाढले; तासाला मिळणार २५० रुपयांपर्यंत

ब्रिक्स परिषदेचे सदस्य भारावले..

पुणे शहरात पाच दिवसांपूर्वी ब्रिक्स राष्ट्रांची परिषद झाली. यात सात दशांचे प्रतिनिधी आले होते. यात देशात किती मोबाईलधारक आहेत. स्मार्टफोन किती लोक वापरतात. तसेच, हरवलेले मोबाईल किती वेगवान पद्धतीने सरकार शोधून देते याची आकडेवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सादर केली. तेव्हा ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले सदस्य भारावून गेले.

Mobile
Prashast 2.0 App: ‘प्रशस्त २.०’ ॲपवर शिक्षकांची परीक्षा; १ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांचे १०० टक्के स्क्रीनिंग

देशातील आकडेवारी...

  • ब्लॉक केलेले मोबाईल : ५८ लाख ४२ हजार ६९०

  • सापडलेले (ट्रेस ) मोबाईल : ३६ लाख ३६ हजार १४१

  • प्रत्यक्षात ताब्यात आले : १३ लाख १६ हजार ७२५

  • शोधून देण्याची टक्केवारी : ३६.२१ %

महाराष्ट्राची आकडेवारी...

  • ब्लॉक केलेले मोबाईल : ७ लाक ११ हजार ५६२

  • सापडलेले मोबाईल : ४ लाख १३ हजार ९१

  • प्रत्यक्षात ताब्यात आले : १ लाख ६८ हजार ७०१

  • शोधून देण्याची टक्केवारी ४०.८४ %

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news