Pune Home Nursing Services: पुण्यात घरगुती नर्सिंग सेवांना वाढती मागणी; वृद्धांच्या काळजीसाठी कुटुंबांचा कल

शस्त्रक्रियेनंतरची काळजी, पक्षाघात व दीर्घ आजारांमुळे होम नर्सिंग सेवांचा वापर झपाट्याने वाढला आहे; 200 हून अधिक ब्युरो सक्रिय असल्याचे चित्र
Nurse
NursePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात वृद्धांची वाढती संख्या, दीर्घकालीन आजारांचे प्रमाण आणि रुग्णालयातील वाढते खर्च, यामुळे घरच्या घरी परिचर्या सेवा देणाऱ्या नर्सेस ब्युरोंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः शस्त्रक्रियेनंतरची काळजी, वृद्ध रुग्णांची देखभाल, पक्षाघात, कर्करोग तसेच बेडरिडन रुग्णांसाठी कुटुंबीयांकडून प्रशिक्षित नर्सची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Nurse
Pune Hawkers License Renewal: पथ विक्रेत्यांसाठी महापालिकेचा इशारा; 31 मेपर्यंत नूतनीकरण करा, अन्यथा परवाना रद्द

दर वर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो. ‌‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य‌’ अशी यंदाच्या दिवसाची थीम आहे. परिचारिका क्षेत्रात कालानुरूप बदल होत आहेत. त्यानुसार नवजात बालके, अंथरुणाला खिळलेले रुग्ण, वृद्ध रुग्ण अशा विविध प्रकारच्या सेवांसाठी घरपोच परिचर्या सेवेला पसंती दिली जात आहे.

Nurse
Pune Land Measurement Issue: पुण्यातील ‘वहिवाट’ जमीन मोजणीचा तिढा अखेर सुटला

कोणत्या सेवा मिळतात?

घरच्या घरी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये रक्तदाब, साखर तपासणी, इंजेक्शन देणे, सलाइन लावणे, औषध वेळेवर देणे, जखमेची ड्रेसिंग, फीडिंग ट्यूब व कॅथेटरची काळजी, फिजिकल सपोर्ट, वृद्धांना अंघोळ घालणे तसेच डॉक्टरांच्या सूचनेनुसार नियमित निरीक्षण यांचा समावेश असतो. काही ब्युरो फिजिओथेरपी व पॅलिएटिव्ह केअरची सुविधाही उपलब्ध करून देत आहेत.

सेवेनुसार शुल्क

शहरातील अनेक नर्सेस ब्युरोंकडे दिवस-रात्र सेवेसाठी स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. साधारणपणे 12 तासांसाठी नर्स किंवा केअर टेकरकडून 800 ते 1,500 रुपये शुल्क आकारले जाते, तर 24 तास सेवेसाठी 1,800 ते 3,500 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. प्रशिक्षित आयसीयूचा अनुभव असलेल्या नर्ससाठी शुल्क अधिक असते.

Nurse
Pune Urban Challenge Fund: पुण्याला 1290 कोटींचा मोठा निधी; पाणीपुरवठा आणि पूरनियंत्रण प्रकल्पांना मंजुरी

नर्सेस ब्युरो आणि होम हेल्थकेअर सेवा देणाऱ्या संस्था

  • पुणे शहर आणि उपनगरांमध्ये लहान-मोठे मिळून अंदाजे 200 हून अधिक नर्सेस ब्युरो आणि होम हेल्थकेअर सेवा देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. यामध्ये नोंदणीकृत कंपन्यांसह अनौपचारिक स्वरूपात चालणाऱ्या ब्युरोंचाही समावेश आहे.

  • अनेक ब्युरो हे खासगी एजन्सी किंवा प्रोप्रायटरशिप स्वरूपात कार्यरत असून, काहींची नोंदणी उद्यम, जीएसटी किंवा स्थानिक व्यावसायिक परवान्यांतर्गत असते.

  • सर्व ब्युरोंसाठी स्वतंत्र आणि एकसंध नियामक यंत्रणा नसल्याने देखरेखीचा प्रश्न कायम आहे. काही संस्था होम हेल्थकेअर कंपनी म्हणून कार्यरत आहेत, तर काही फक्त ‌‘केअरटेकर पुरवठा‌’ पद्धतीने सेवा देतात.

  • काही ब्युरोंविरोधात अपुरे प्रशिक्षित कर्मचारी देणे, वेळेवर बदल न देणे, जास्त शुल्क आकारणे, कर्मचाऱ्यांचे वर्तन तसेच विश्वासार्हतेबाबत तक्रारी येत असल्याचे दिसते. त्यामुळे पूर्ण चौकशी करूनच परिचारिका निवडावी, असे जाणकार सांगतात.

Nurse
Pirangut Ghat Garbage Problem: पिरंगुट-भुकूममध्ये कचऱ्याचा विळखा; कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

कोरोनानंतर घरच्या घरी उपचार आणि काळजी घेण्याबाबत लोकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे ब्युरोकडे प्रशिक्षित परिचारिकांबाबत विचारणा वाढली आहे. पूर्वी महिन्याला 20 ते 25 फोन चौकशीसाठी यायचे. आता दररोज किमान 10-15 फोन येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशिक्षित नर्सची मागणी जास्त आहे.

स्वाती कदम, संचालिका, नर्सेस ब्युरो

वडिलांना पक्षाघातानंतर सतत देखभालीची गरज होती. रुग्णालयात ठेवणे खर्चीक होत होते. त्यामुळे घरच्या घरी नर्सची नेमणूक केली. औषधे, व्यायाम आणि नियमित तपासणीमुळे त्यांना मोठा आधार मिळाला. ब्युरोकडे नर्सबाबत चौकशी करताना ओळखपत्राची आवर्जून विचारणा करावी, जेणेकरून विश्वासार्हता वाढते.

संदीप कुलकर्णी, बाणेर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news