Pirangut Ghat Garbage Problem: पिरंगुट-भुकूममध्ये कचऱ्याचा विळखा; कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

वारंवार कारवाईनंतरही रस्त्याकडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच, मुळशीतील रस्ते कचरामुक्त करण्याची मागणी
Pirangut Ghat Garbage
Pirangut Ghat GarbagePudhari
Published on
Updated on

विनोद माझिरे

पिरंगुट: पिरंगुट आणि भुकूम ग््राामपंचायतींकडून कचरा टाकणाऱ्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे आता अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Pirangut Ghat Garbage
Rajgad Illegal Mining Action: राजगडमध्ये अवैध गौणखनिज उत्खननावर धडक कारवाई; सहा वाहनांवर दंड

भुगाव ग््राामपंचायतीने यापूर्वी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून कारवाई केली होती. त्यानंतर त्या परिसरातील कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले होते. अशाच प्रकारची कारवाई पिरंगुट आणि भुकूम परिसरातही करण्याची मागणी होत आहे.

Pirangut Ghat Garbage
Shikrapur Water Leakage: शिक्रापूरमध्ये पाणी गळतीचा मोठा प्रश्न; हजारो लिटर पाणी वाया

घोटावडे फाटा चौकाच्या चारही बाजूंना रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. मुळशीतील सर्व रस्ते कचरामुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, काही नागरिक स्वतःच घरगुती कचरा रस्त्यावर टाकत असल्याची खंत ग््राामपंचायतीने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फळ व भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला जागा व्यापल्याचा आरोप होत आहे. फळ खरेदीसाठी थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पीएमआरडीएकडून कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news